मराठी बातम्या /बातम्या /Viral /अशी बायको होणे नाही! संसार वाचवण्यासाठी तिने नवऱ्यासाठी शोधली गर्लफ्रेंड

अशी बायको होणे नाही! संसार वाचवण्यासाठी तिने नवऱ्यासाठी शोधली गर्लफ्रेंड

व्हायरल

व्हायरल

प्रेम आणि लग्न या प्रत्येकाच्या आयुष्यातील खाास गोष्टी आहेत. लग्नाला तर पवित्र बंधन मानले जाते. दोन व्यक्ती, दोन कुटुंब एकत्र येत आयुष्यभर एकत्र राहण्याचं वचन घेतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 25 मार्च : प्रेम आणि लग्न या प्रत्येकाच्या आयुष्यातील खाास गोष्टी आहेत. लग्नाला तर पवित्र बंधन मानले जाते. दोन व्यक्ती, दोन कुटुंब एकत्र येत आयुष्यभर एकत्र राहण्याचं वचन घेतात. मात्र काही जणांचं हे वचन अगदी काही महिन्यांत, काही वर्षात तुटलेलं पहायला मिळतं. अनेक लग्नांमध्ये प्रेम तर काही लग्नांमध्ये तक्रारही पहायला मिळते. अनेकजण या गोष्टींमुळे एकमेकांपासून वेगळे होतात तर काहीजण लग्न टिकवण्यासाठी काहीही करायला तयार असतात. सध्या समोर आलेल्या घटनेमध्ये एका महिलेनं आपलं लग्न टिकवण्यासाठी धक्कादायक पाऊल उचलल्याचं समोर आलंय. हे प्रकरण नेमकं काय आहे? याविषयी जाणून घेऊया.

न्यूयॉर्क पोस्ट वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, हे विचित्र प्रकरण न्यूयॉर्कच्या लाँग आयलंडमधील आहे. ब्रायंट क्विंटाना आणि तेहमीना क्विंटाना हे पती-पत्नी आहेत, परंतु ब्रायन अनेकदा इतर स्त्रियांच्या प्रेमात पडतो. जेव्हा तेहमीनाला तिचा नवरा ब्रायंटचे दुसर्‍या महिलेशी प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली तेव्हा तिला वाटलं की दोघांचे तीन वर्षाचे लग्न मोडेल. मग तिने ठरवलं की ती तिच्या लग्नाला ओपन मॅरेज करायचं, म्हणजे असा विवाह ज्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीचा समावेश करता येईल.

हेही वाचा -  6 वर्षांपूर्वीचा प्रियकरच निघाला बॉस; तरुणीसोबत घडला विचित्र प्रकार, नेमकं काय झालं?

तेहमीनाने नवऱ्यासाठी तिच्यासारखीच एक गर्लफ्रेंड शोधली. तीने सोशल मीडियावर आपला लूक शोधायला सुरुवात केली आणि ती ऑस्ट्रेलियन मॉडेल कायरा जॉनसनला भेटली. कैराचा लूक तेहमीनासारखाच आहे, ती पोनी टेल देखील बनवते आणि तितकीच ग्लॅमरस आहे. जेव्हा कायराला या नात्याबद्दल सांगण्यात आले तेव्हा तिला ही संकल्पना आवडली आणि ती ऑस्ट्रेलियाहून अमेरिकेत आली. त्यांच्यातील नाते खूप घट्ट झाले, त्यामुळे कायरा या जोडप्यासोबत त्यांच्या घरी शिफ्ट झाली आणि आता तिघेही एकत्र राहतात. एवढेच नाही तर ते एकच बेड देखील शेअर करतात. तेहमीनाने सांगितले की, जेव्हा ती कायरासोबत बाहेर जाते तेव्हा लोक त्यांना जुळ्या बहिणी म्हणतात.

दरम्यान, लग्न वाचवण्यासाठी महिलेने केलेला हा प्रकार सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. अनेकजण महिलेच्या या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

First published:
top videos

    Tags: Love, Marriage, Top trending, Viral