OMG!एक बर्गर खाण्यासाठी बुक केलं हेलिकॉप्टर; 362 किमी प्रवास करून पोहोचला रेस्टॉरंटमध्ये

OMG!एक बर्गर खाण्यासाठी बुक केलं हेलिकॉप्टर; 362 किमी प्रवास करून पोहोचला रेस्टॉरंटमध्ये

केवळ एक बर्गर खाण्यासाठी त्या श्रीमंत व्यक्तीने, फक्त दोन तासांसाठी संपूर्ण हेलिकॉप्टरच बुक केलं. हेलिकॉप्टर बुक करून, एक बर्गर खाण्यासाठी तो, तब्बल 362 किलोमीटरचं अंतर कापून McDonald's मध्ये पोहचला.

  • Share this:

मॉस्को, 5 डिसेंबर : आपली आवडती वस्तू मिळवण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. यात अनेक खवय्यांचाही समावेश आहे. आपल्या आवडीचा पदार्थ खाण्यासाठी अनेक जण लांबचा प्रवास करतात. असाच काहीसा एक प्रकार समोर आला आहे. एका खवय्याने आपल्या आवडीचा बर्गर खाण्यासाठी तब्बल 362 किलोमीटरचा प्रवास केला आहे.

एका व्यक्तीला बर्गर खाण्याची इच्छा झाली होती. पण तो असलेल्या जवळपासच्या ठिकाणी त्याला बर्गर खाण्यासाठी चांगलं असं कोणतंही दुकान आवडलं नाही. जवळपास कोणतंही बर्गरचं चांगलं दुकान नाही म्हणून, त्याच्या आवडत्या ठिकाणी जाण्यासाठी त्या श्रीमंत माणसाने थेट हेलिकॉप्टरचं बुक केल्याची घटना घडली आहे.

(वाचा - प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला विना कपड्यात YouTuberने बाल्कनीत बसवलं; आणि जे झालं.....)

mirror.co.uk च्या रिपोर्टनुसार, केवळ एक बर्गर खाण्यासाठी त्या श्रीमंत व्यक्तीने, फक्त दोन तासांसाठी संपूर्ण हेलिकॉप्टरच बुक केलं. ही घटना रशियातील असून या श्रीमंत व्यक्तीचं नाव विक्टर मार्टिनोव (Viktor Martynov) असं आहे. दोन तासांसाठी, केवळ एक बर्गर खाण्यासाठी थेट हेलिकॉप्टर बुक करणाऱ्या या श्रीमंत व्यक्तीचा प्रायव्हेट याटचा व्यवसाय आहे.

हेलिकॉप्टर बुक करून, एक बर्गर खाण्यासाठी तो, तब्बल 362 किलोमीटरचं अंतर कापून मॅक्डोनाल्डमध्ये (McDonald's) पोहचला. तो असलेल्या ठिकाणापासून ते 362 किलोमीटरवर असलेल्या McDonald's मध्ये पोहचण्यासाठी, कोट्यधीश असलेल्या विक्टरने जवळपास 2 लाख रुपये हेलिकॉप्टर राईडवर खर्च केले. गर्लफ्रेंडला सोबत घेऊन तो हेलिकॉप्टरने बर्गर खाण्यासाठी पोहचला.

(वाचा - भयंकर! हुकुमशाहची दहशत सुरुच, कोरोनाचे नियम मोडणाऱ्याला Kim Jong Unने घातली गोळी)

33 वर्षीय विक्टर क्रीमियामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत होता. त्यावेळी त्याला बर्गर खाण्याची इच्छा झाली आणि तो Crimea तून, Krasnodar मध्ये 362 किमीवर असेलल्या McDonald's मध्ये पोहचला. दरम्यान, हेलिकॉप्टर भाड्याने देणाऱ्या कंपनीने, अशाप्रकारे यापूर्वी, केवळ बर्गर खाण्यासाठी हेलिकॉप्टरचं बुकिंग कधीही झालं नसल्याचं सांगितलं.

Published by: Karishma Bhurke
First published: December 5, 2020, 3:54 PM IST
Tags:

ताज्या बातम्या