80 वर्षीय आई-वडिलांना मुलांनी सोडलं, पोट भरण्यासाठी त्यांनी सुरू केला 'बाबा का ढाबा'; VIDEO VIRAL

80 वर्षीय आई-वडिलांना मुलांनी सोडलं, पोट भरण्यासाठी त्यांनी सुरू केला 'बाबा का ढाबा'; VIDEO VIRAL

देशभरातील प्रत्येक राज्यात अशी उदाहरणं आहेत, ज्यांनी आर्थिक संकटाला कंटाळून आपलं जीवन संपवलं. मात्र जगण्याची उमेद देणारी, पुन्हा मेहनतीनं उभी राहणारी फार कमी लोकं असतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर : कोरोनाच्या संकटानं अनेकांना बेरोजगार केलं, तर काहींच्या उपजिविकेचं साधनं हिसकावलं. देशभरातील प्रत्येक राज्यात अशी उदाहरणं आहेत, ज्यांनी आर्थिक संकटाला कंटाळून आपलं जीवन संपवलं. मात्र जगण्याची उमेद देणारी, पुन्हा मेहनतीनं उभी राहणारी फार कमी लोकं असतात. असंच दिल्लीतील एका 80 वर्षीय जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिल्लीतील मालविया नगर जवळ 80 वर्षीय दाम्पत्यांनी बाबा का ढाबा सुरू केला आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये ढाबा बंद होता, त्यामुळे या दाम्पत्याला दोन वेळचं अन्नही मिळत नव्हतं. मुलांनी मदत करण्यास नकार दिल्यानंतर वयाच्या 80व्या वर्षी हे जोडपं ढाबा चालवत आहे.

वाचा-पाकिस्तानमधील तो व्हायरल चहावाला आठतोय का? आता आहे स्वत:चा कॅफे; पाहा VIDEO

आयएएस ऑफिसर अवनीश शारन यांनीही बाबा का ढाबाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

वाचा-103व्या वर्षी 14,000 फुटांवरून उडी मारली उडी; जिगरबाज आजोबांच्या VIEDO व्हायरल

सोशल मीडियावर सध्या बाबा का ढाबा ट्रेंड होत असून, लोकांनी या ढाब्यावर जावे असे आवाहन केले जात आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये ढाब्यावर ग्राहक नसल्यामुळे जोडपं रडत आहे. लॉकडाऊननंतर आता हॉटेल, ढाबा सुरू करण्याची परवागनी देण्यात आली असली तरी लोकं या लहानश्या ढाब्यावर जात नाहीत.

क्रिकेटर आर अश्विननंही ट्वीट करत या जोडप्याला मदत करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, स्वत: त्यांना मदत करणार असल्याचे सांगितले.

वाचा-सोशल मीडिया वापरणारी बायको नको! बंगाली वकिलानं ठेवली लग्नासाठी अजब अट

दरम्यान सोशल मीडियावर काही लोकांनी बाबा का ढाबा यांचे मटार पनीर सर्वात भारी असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे या मटार पनीरचा आस्वाद घेण्यासाठी आणि या जोडप्याला मदत करण्यासाठी ढाब्य़ावर नक्की जा, असे आवाहन केले जात आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: October 8, 2020, 9:15 AM IST

ताज्या बातम्या