मुंबई : अनेकदा असं होतं की लोक कुत्र्याला पाहून घाबरतात, कारण ते चावतील किंवा अंगावर येतील अशी त्यांना भिती वाटते. त्यात रात्रीच्या वेळी देखील कधीकधी कुत्रे पाठी लागतात, तेव्हा त्यांच्याशी डिल कसं करायचं किंवा त्याला सामोरं कसं जायचं? याबाबत अनेकांना प्रश्न पडतो.
पण आता टेन्शन घेऊ नका, आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत. जेणेकरून कुत्रे तुमच्यावर भुंकणार नाहीत किंवा ते तुमचे मित्र बनतील.
कुत्र्याच्या जवळ कसे जाऊ शकता किंवा त्याच्याशी मैत्री कशी करावी हे जाणून घेण्याचे हे 5 प्रमुख चिन्ह आहेत.
माकडाने केली किडनॅपिंग; हे कॅमेरात कैद झालं नसतं, तर विश्वास ठेवणं ही कठीण
ऑफिसजवळच्या कुत्र्यांमुळे रस्त्यावर जाण्याची भीती वाटत असेल, तर रोज त्यांच्यासाठी खाण्या-पिण्यासाठी काहीतरी घेऊन जावे आणि त्यांना द्यावे. यामुळे ते तुमचे मित्र बनतील आणि तुमच्यावर पुन्हा कधीही हल्ला करणार नाही.
तुम्ही कधीही तुमच्या स्कूटी किंवा बाईकवरून जात असाल तर तुम्ही वाहन जास्त वेगाने चालवू नये. अन्यथा भीतीपोटी कुत्रा तुमच्यावर हल्ला करू शकतो.
डोळांनी संपर्क करा किंवा त्याच्या डोळ्यात पाहा, त्याला तुमच्याशी मैत्री करायची आहे का ते पहा. बर्याच अभ्यासातून असे दिसून आले आहे की जर कुत्रा तुमच्या नजरेला नजर देत असेल, तर हा कुत्रा तुमच्या जवळ येऊ इच्छितो आणि त्याला तुमच्याकडून प्रेम हवे आहे. कुत्र्यांना मारण्याऐवजी किंवा हकलवण्या ऐवजी तुम्ही चांगले वागलात तर कदाचित ते तुमच्यात मिसळतील.
जर तुम्ही कुत्र्याला ओरडले किंवा त्यांना लांब पळवले तर तुम्ही त्यांच्याशी कधीही मैत्री करू शकणार नाही. यामुळे ते घाबरतील आणि हल्ला करण्याचा प्रयत्न करतील. त्याऐवजी, त्यांच्या जवळ जाऊन त्यांना योग्य वागणूक द्या. प्राण्यांशी गैरवर्तन करण्याऐवजी, त्यांना प्रेमाने बोलावा, यामुळे बऱ्याचदा ते तुमचे मित्र बनतील.
कुत्र्यांमध्ये वास घेण्याची शक्ती असते. त्यांना प्रथम तुमच्याबद्दल अनुभव येऊ द्या, तो तुम्हचा वास घेईल आणि समजेल की तुम्ही त्याला काही इजा करणार नाही, जेणेकरून पुढच्या वेळी तुम्ही त्याच्या जवळ याल तेव्हा तो तुम्हाला सहज ओळखू शकेल.
तुम्हाला त्याच्या हावभावावरून कळेल की तो तुम्हाला इजा करणार नाही, त्यानंतर तुम्ही त्यांच्या डोक्यावर हात फिरवून त्याला तुमचा मित्र बनवा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dog, Social media, Top trending, Viral