Home /News /viral /

'गल्ली क्रिकेट'मध्ये फलंदाजाने मारला विचित्र छक्का, 60 लाख वेळा पाहिला गेला VIDEO

'गल्ली क्रिकेट'मध्ये फलंदाजाने मारला विचित्र छक्का, 60 लाख वेळा पाहिला गेला VIDEO

सध्या टिकटॉकवर एक व्हिडीओ असा व्हायरल होत आहे की जर तुम्ही क्रिकेटचे चाहते असाल तर या व्हिडीओमधील मुलाचे तुम्ही फॅन व्हाल.

  मुंबई, 29 मे : टिकटॉकवर (TikTok) अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यावर विविध प्रकारचे चॅलेंज दिले जातात, कधी वेगवेगळे फिल्टर वापरून केलेले व्हिडीओ असता. मात्र सध्या टिकटॉकवर एक व्हिडीओ असा व्हायरल होत आहे की जर तुम्ही क्रिकेटचे चाहते असाल तर या व्हिडीओमधील मुलाचे तुम्ही फॅन व्हाल. धोनीचा हेलिकॉप्टर शॉट सर्वांना माहिती आहे किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये असे अनेक खेळाडू आहेत की ज्यांचे प्रत्येकाचे असे काही वेगळे शॉट्स आहेत. क्रिकेट खेळणारी मुलं याच काही प्रसिद्ध शॉट्सना कॉपी करून खेळण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र या व्हिडीओमध्ये जो मुलगा आहे त्याने मारलेला शॉट काहीतरी भलताच आहे. यामध्ये फलंदाजाने मागे वळून छक्का मारला आहे. त्याचा हा शॉट पाहून त्याच्याबरोबर खेळणारे देखील आश्चर्यचकित झाले आहेत. (हे वाचा-दोन छोट्या भावंडांचे VIDEO झाले धम्माल हिट; ऑस्ट्रेलियातून गातायत मराठी गाणी) टिकटॉकवर हा व्हिडीओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की गोलंदाज चतुराईने फलंदाजाच्या पायाजवळ बॉल टाकतो. मात्र त्यावर फटका मारण्यासाठी हा पठ्ठ्या आपला अँगलच बदलून टाकतो आणि मागे वळून जोरदार छक्का मारतो. त्याचा हा शॉट पाहून त्याच्या सवंगड्यांना देखील आश्चर्य वाटलं असणार आहे. ज्या टिकटॉक युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे त्याने देखील या व्हिडीओला 'different Shot' असं कॅप्शन दिलं आहे.
  @shameersyamdifferent shot 😎 ##cricketlover♬ original sound - iqbal Kandiga
  हा व्हिडीओ आतापर्यंत 6.3 मिलियन पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. तर 7 लाखापेक्षा जास्त लाइक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. टिकटॉकवर हा व्हिडीओ खूप प्रसिद्ध होत आहे. त्याचप्रमाणे इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर देखील हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Tiktok, Tiktok viral video

  पुढील बातम्या