बहिणीसोबत TikTok केला म्हणून भावाने तरुणाला बदडलं, विवस्त्र धिंड काढत VIDEO केला VIRAL
टिकटॉक व्हिडिओमुळे एका तरुणाची विवस्त्र धिंड काढण्यात आली. यावेळी तरुणाला जबर मारहाणही झाली. जमावाने एवढ्यावरच न थांबता त्याचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर टाकला आहे.
जयपुर, 10 फेब्रुवारी : कमी वेळाचे व्हिडिओ शेअरिंग अॅप TikTok ची तरुणांसह सर्वच युजर्समध्ये क्रेझ आहे. अल्पावधीतच टिकटॉकने लोकप्रियता मिळवली आहे. यावर बराच वेळ वाया घालवत असल्याचंही समोर आलं आहे. दरम्यान, राजस्थानमधील जयपूर इथं टिकटॉक व्हिडिओमुळे एका तरुणाची विवस्त्र धिंड काढण्यात आली. यावेळी तरुणाला जबर मारहाणही झाली. जमावाने एवढ्यावरच न थांबता त्याचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर टाकला आहे. तरुणाने शेजारी राहणाऱ्या 14 वर्षीय मुलीसोबत टिकटॉक व्हिडिओ शूट केल्याचा आरोप होता.
अतिरिक्त पोलिस उपायुक्त मनोज चौधरी यांनी सांगितले की, ज्या तरुणाला मारहाण झाली त्याने गावातील एका 14 वर्षीय मुलीसोबत व्हिडिओ शूट करून टिकटॉकवर अपलोड केला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी तरुणाला मारहाण केली. त्यानंतर त्याला जबरदस्तीने कपडे उतरवण्यास सांगितली. मारहाण केल्या प्रकऱणी तरुणाने पोलिसात तक्रारही दाखल केली आहे.
Rajasthan: Youth paraded naked for shooting video with 14-yr-old girl in Jaipur&uploading it on TikTok. Additional DCP Manoj Choudhary says, "After video went viral, girl's father made youth take off clothes&beat him up. Girl has lodged FIR against youth under POCSO&SC/ST Acts". pic.twitter.com/wGIvHVDyDJ
जयपूरमधील जवाहर नगर भागातील हा प्रकार आहे. तरुणाने अल्पवयीन मुलीसोबत व्हिडिओ तयार केला. दोघेही शेजारी-शेजारी राहतात. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुलीच्या घरचे नाराज झाले. त्यानंतर मुलीच्या वडील आणि भावाने इतर लोकांसोबत मिळून तरुणाला मारहाण केली आणि त्याला निर्वस्त्र केलं.
तरुणाला कपड्यांशिवाय रस्त्यावरून फिरवण्यात आलं. तसंच त्याला कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. याचा व्हिडिओ शूट करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. पीडित तरुणाच्या कुटुंबियांनी पोलिसांत मारहाण करणाऱ्यांविरोधात तक्रार केली आहे. तसंच मुलीच्या कुटुंबियांनी तरुणाविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली आहे.