मुक्याने बोलायची मोबाईल युक्ती! शाळकरी मुलांनी TikTok VIDEO तून सांगितली भन्नाट आयडिया

मुक्याने बोलायची मोबाईल युक्ती! शाळकरी मुलांनी TikTok VIDEO तून सांगितली भन्नाट आयडिया

सध्या टिकटॉकवर एकही शब्द न उच्चारता एकमेकांशी कानात बोलण्याची कला शिकवली जात आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

  • Share this:

सोशल मीडिया हे माध्यम दररोज नवीन काहीतरी घेऊन येतं. कधी काय व्हायरल होईल हे सांगणं कठीण असतं. यातही व्हायरल झालेल्यामध्ये काही चांगलं तर काही वाईटही असतं. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटस्अॅपनंतर सध्या टिकटॉकने लोकप्रियता मिळवली आहे. टिकटॉकने फेसबुकलाही मागे टाकलं आहे. लहान व्हिडिओसाठी वापरण्यात येणाऱ्या या अॅपवर कोणतेही गाणे ट्रेंडमध्ये येऊ शकते.

सध्या इथं एकही शब्द न उच्चारता एकमेकांशी कानात बोलण्याची कला शिकवली जात आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. शब्दही न उच्चारता संवाद साधण्यासाठी हातवारे करू शकतो पण कानात कसं सांगणार असा प्रश्न पडला असेल. पण यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतल्यास हे शक्य आहे.

सध्या वायरलेस हेडफोन तसेच एअरपॉड बाजारात उपलब्ध आहेत. त्यातही दोन्ही कानातील एअरपॉडचा वापर करून एकमेकांशी बोलण्याची ही कला टिकटॉकवरील काही टेक्नो हॅकर्सनी पुढे आणली आहे.

तुमचे हेडफोन मोबाइलला कनेक्ट करायचे आणि त्यानंतर दोनपैकी एक हेडफोन ज्याच्याशी बोलायचं आहे त्याला द्यायचा आणि त्याच्याकडचा एक आपल्याकडे घ्यायचा. त्यानंतर गुगल ट्रान्सलेटमध्ये आपल्याला जे बोलायचं आहे ते टाइप करायचं. ते टाइप केल्यानंतर त्याचा ऑडिओ प्ले करायचा की तुम्हाला जे म्हणायचं आहे ते थेट समोरच्याला कानात एअरपॉडने ऐकू जाईल.

फोटो खरा आहे बरं का! पाहा रात्रीच्या अंधारात कसा दिसतो भारत

फक्त गाणीच नाही तर अनेक शिकण्यासारख्या गोष्टीही यावर आहेत. कोणी इंग्रजीचे धडे देतं तर कोणी फोटोग्राफीच्या टिप्स. याशिवाय टेक्नॉलॉजी, नव्या तंत्रज्ञानाची ओळख लहानशा व्हिडिओतून करून देण्याचा प्रकारही टिकटॉकवर प्रचंड लोकप्रिय आहे.

शिक्षिकेनं असा शिकवला 9चा पाढा की शाहरुखही झाला फॅन! VIDEO VIRAL

First published: January 28, 2020, 12:39 PM IST

ताज्या बातम्या