'जरा जरा टच मी' गाण्यावर करत होती Tiktok; मागून आला कुत्रा आणि... पाहा VIDEO

'जरा जरा टच मी' गाण्यावर करत होती Tiktok; मागून आला कुत्रा आणि... पाहा VIDEO

भारतात Tiktok वर बंदी आल्यानंतर आता असे टिकटॉक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 जून : भारतात टिकटॉकसह (TikTok) 59 चायनीज अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली. अशात आता काही टिकटॉक स्टार्सचे (TikTok Star) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral)  होऊ लागलेत. अशीच एक टिकटॉक स्टार आपला व्हि़डीओ बनवत होती, त्यावेळी अचानक तिच्यामागून एक कुत्रा येतो आणि त्यानंतर नेमकं काय होतं, हे सर्व या व्हिडीओत रेकॉर्ड झालं आहे.

टिकटॉकचा व्हिडीओ बनवताना टिकटॉक स्टार त्यात इतके गुंततात की आपल्या आजूबाजूला काय होतं आहे, कोण आहे, याचं भानही त्यांना राहत नाही. असाच अनुभव एका टिकटॉक स्टारने घेतला. एका ट्विटर युझरने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओत आपण पाहू शकतो. टिकटॉक स्टार आपल्याच सोसासयटीत 'जरा जरा टच मी टच मी टच मी' या बॉलीवूड गाण्यावर डान्सचा व्हिडीओ बनवत होती. ती आपल्या डान्समध्ये इतकी रमली की तिच्या मागून कुत्रा कधी येतो ते तिला समजतही नाही. हा कुत्रा अचानक येतो आणि या टिकटॉक स्टार्सचा चावाच घेतो. यानंतर मात्र ही टिकटॉक स्टार व्हिडीओ आणि डान्स सोडून कुत्र्यापासून वाचण्याचा प्रयत्न करते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातो आहे.

हे वाचा - चायनीज अ‍ॅपवर भारतात बंदी; मग Zoom, PUBG आणि WhatsApp वर का नाही?

गेल्या काही दिवसांमध्ये Tik Tok हे भारतात प्रचंड लोकप्रिय झालं आहे. देशातले अनेक तरुण Tik Tokच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करत असून ते सेलिब्रिटीही झाले आहेत. आता देशाच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 A च्या अंतर्गत या App वर बंदी घातल्याने या स्टार्सचं काय होणार असा प्रश्न विचारला जातोय.

हे वाचा - TikTok, Helo तुम्हीही वापरत असाल तर बंदीनंतर सगळ्यात आधी करा हे काम

अनेक युवकांनी तर नोकरी सोडून असे व्हिडीओ तयार केले आहेत. त्यातून त्यांना लाखोंची कमाईसुद्धा झाली आहे. या युवकांचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्यामुळे या युवकांना अनेक कंपन्या स्पॉन्सरही करत आहेत. त्याचबरोबर त्यांना जाहिरातीसुद्धा मिळत आहेत. आता या तरुणांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

संपादन - प्रिया लाड

First published: June 30, 2020, 4:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading