Tiktok वर अमेरिकेचा दबाव? CEO केविन मेयर यांचा राजीनामा

Tiktok वर अमेरिकेचा दबाव? CEO केविन मेयर यांचा राजीनामा

पदभार स्वीकारल्यानंतर 3 महिन्यांनी केविन यांनी राजीनामा दिल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 ऑगस्ट : जगप्रसिद्ध असलेलं चायनिज अॅप Tiktok गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. कमी वेळात सगळ्यात जास्त प्रसिद्ध झालेल्या या अॅपवर भारतासह इतर देशांवरही बंदी घालण्यात आल्यानंतर आता कंपनीचे सीईओ केविन मेयर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

केविन मेयर यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तीन महिन्यातच राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे.की केविन मेयर यांनी यावर्षी मे महिन्यात डिझनी स्ट्रीमिंगच्या प्रमुखपदावरून पायउतार झाल्यानंतर 1 जूनला बाईटडान्सच्या मालकीचं असलेल्या टिकटॉक अॅपचा सीईओ पदाचा कार्याभार सांभाळला. CNBC ला दिलेल्या माहितीनुसार जनरल मॅनेजर वनीसा पपाज यांची प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हे वाचा-ट्रम्प यांचा चीनला आणखी एक दणका; व्यापारासंबंधाबाबत दिला इशारा

टिकटॉकला खरेदी करण्यासंदर्भात सध्या बाईटडान्सची मायक्रोसॉफ्टसोबत चर्चा सुरू आहे. इतकच नाही तर अमेरिकन कंपनी ओराकलही टिकटॉक विकत घेण्यात स्वारस्य दाखवत असल्याची सध्या चर्चा सुरू आहे.

बाईटडान्सचे कंपनीच्या टिकटॉक या अॅप भारतासह अनेक देशांनी बंदी घातली आहे. भारत-चीन सीमेवरील तणाव आणि कोरोनामुळे चीन वस्तू आणि अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनवर दबाव टाकत असल्याची चर्चा आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 27, 2020, 12:45 PM IST

ताज्या बातम्या