हृतिक रोशन ते रेमो डिसूझा सर्वजण शोधत आहेत या 'मायकल जॅक्सनला', पाहा VIDEO

हृतिक रोशन ते रेमो डिसूझा सर्वजण शोधत आहेत या 'मायकल जॅक्सनला', पाहा VIDEO

Viral video नंतर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (amitab bacchan) यांनीही या युवकाचं सोशल मीडियावर कौतुक केलं.

  • Share this:

मुंबई, 15 जानेवारी: सोशल मीडियावर (social media) प्रसिद्धी मिळवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. एका व्हिडिओमुळे (video) अनेकांचं आयुष्य बदलल्याचा घटना ऐकत असतो. त्यातलं नुकतच उदाहरण म्हणजे राणू मंडल (ranu mandal) यांचं. रेल्वे स्थानकावर गाणाऱ्या राणू मंडल सोशल मीडियावर व्हायरल (viral) झालेलेल्या एका व्हिडिओमुळे एका रात्रीमध्ये प्रसिद्ध झाल्या आणि हिमेश रेशमिया यांनी त्यांना गाण्यासाठी ऑफर दिली. आता आणखी एका मुलाचा टीकटॉक (tik tok video) व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या मुलाचा डान्स (dance) पाहून नेटकऱ्यांनी तुफान लाईक्सचा पाऊस पाडला आहे. हा य़ुवकाच्या व्हिडिओची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. त्यानंतर रेमो डिसूझांपासून (Remo D'souza) ते हृतिक रोशनपर्यंत सगळेजण या युवकाचा पत्ता शोधत आहेत.

टीकटॉक (tik tok) वरील या व्हिडिओनं ट्विटरवर चांगला धुमाकूळ घातला आहे. रेमो डिसूझा यांचा आगामी चित्रपट 'स्ट्रीट डांसर 3' च्या नव्या गाण्यासाठी हा युवक डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. एकाच नाही तर अनेक गाण्यांवर या युवकानं ठेका धरला आणि कोरियोग्राफरसह अनेक नेटकरी आणि सेलिब्रिटींची मन जिंकून घेतली. या युवकाचा जबरदस्त डान्स पाहून मायकल जॅक्सन यांची आठवण आल्याशिवाय रहात नाही.

तुम्ही जर हा व्हिडिओ नीट पाहिलात तर युवकाच्या डान्स स्टेप्स सुपर डान्सर हृतिक रोशन आणि माय़कल जॅक्सन यांच्या डान्सची आठवण करून देतात. चेहऱ्यावरील हावभाव आणि तोल सांभाळून अगदी सहजपणे केलेला हा डान्स मन जिंकल्याशिवाय रहात नाही. 'वाह! क्या बात है' सारखा नेटकऱ्यांच्या तोंडून प्रतिक्रिया येत आहे.

@babajackson2020Michael Jackson Panther dance made byharpreet_sdc

♬ original sound - jacksonbaba😎

बॉलिवडूमधील दिग्गज कलाकारांनीही या अवलियाचं कौतुक केलं आहे.' मी आजपर्यंत या पेक्षा जास्त स्‍मूद एयरवॉकर कधी पाहिला नाही' अशी प्रतिक्रिया सुपर डान्सर हृतिक रोशनने त्याचा व्हिडिओ ट्वीट करून दिली आहे. रेमो डिसूझा, बिग बी अमिताभ बच्चन यांनीही युवकाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा युवक टिक-टॉक (Tik-Tok) अॅपवर @Babajackson2020 या नावानं आपले व्हिडिओ अपलोड करत आहे. युवराज सिंग नावाचा युवक हे अकाऊंट हॅण्डल करत असल्याची माहिती मिळत आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: January 15, 2020, 12:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading