मुंबई, 15 जानेवारी : सोशल मीडियावर कधी कोणत्या विषय़ावर काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. कधी डान्स तर कधी प्राणी प्रेम तर कधी मनोरंजन करणारे व्हिडिओ व्हायरल (viral) होत असतात. प्रेम , लग्न, गर्लफ्रेंड असण्याचे तोटे आणि फायदे यासारख्या अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र त्यातही एक व्हिड़िओ तुफान ट्रेन्डिंगमध्ये आहे तो म्हणजे लग्नानंतर होणारे नवऱ्यामुलाचे हाल.
बायको आपले कसे हाल करते हे दाखवण्यासाठी नवरामुलगा आपल्या मित्राला घरी घेऊन येतो आणि त्यानंतर जो बायको रूद्र अवतार धारण करते ते पाहून आपल्या मित्राला लग्न न करण्याचा सल्ला कसा बरोबर आहे ते पटवून देतो. या व्हिडिओची चर्चा सध्या नव वरांमध्ये होत आहे. प्रेम विवाह करणाऱ्यांनी हा video एकदातरी पाहायलाच हवा असंही सोशल मीडियावर लिहिलं जात आहे.
टिक टॉकवर @rachitrojha नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हा VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यंदा लग्न करणाऱ्यांनी हा VIDEO नक्की पाहावा असंही सोशल मीडियावर सांगितलं जात आहे. लग्न करण्याचे तोटे काय आहेत असं या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलं आहे.
प्रेमी युगुलाचं लग्नात रुपांतर झाल्यानंतर परिस्थिती काय होते. लग्न झाल्यानंतर बायको कशी बदलते आणि लग्न केल्यानं काय तोटा होते हे तरुण आपल्या मित्राला पटवून देण्यासाठी आपल्या घरी आणतो आणि प्रत्यक्षात डेमो देतो. असा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिड़िओला आतापर्यंत 695.9 हजार लाईक्स मिळाल्या आहेत.