'खुशी के पल...', पराभवानंतर भाजपच्या TikTok क्वीनचा VIDEO VIRAL

'खुशी के पल...', पराभवानंतर भाजपच्या TikTok क्वीनचा VIDEO VIRAL

भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या TikTok स्टारचा पराभव झाला. त्यानंतर रडत असलेले VIDEO सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • Share this:

चंदीगड, 25 ऑक्टोबर : हरियाणा विधानसभा निवडणुकीत आदमपूर मतदारसंघातून भाजप उमेदवार सोनाली फोगटला पराभव पत्करावा लागला आहे. काँग्रेसचे उमेदवार कुलदीप बिश्नोई यांनी विजय मिळवला. टिकटॉक क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनाली फोगटचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आदमपूर विधानसभा मतदारसंघातील निकाल समोर येऊ लागताच सोनाली फोगटचे टिकटॉकवर दर्दभऱ्या गाण्यांवरचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ज्यावेळी भाजपने त्यांना तिकिट दिलं नव्हतं त्यावेळी हे व्हिडिओ तयार करण्यात आले होते. आता पराभव झाल्यानंतर व्हायरल केले जात आहेत.

भाजपने उमेदवारी दिल्यानंतर सोनालीने म्हटले होते की, माझे सर्व फॉलोअर्स मला पाठिंबा देतील. माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ते वाट बघत आहेत. पक्षाने मला संधी दिली असून मला खात्री आहे की मी निवडणूक जिंकेन.

सोनाली फोगट टिकटॉक स्टार आहे. तिच्या फॉलोअर्सची संख्या लाखांमध्ये आहे. याशिवाय काही व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल सुद्धा होतात.

सोनालीचे पती संजय फोगट भाजपचे नेते होते. त्यांच्या निधनानंतर सोनालीने भाजपमध्ये प्रवेश केला. हरियाणातील भाजपची महिला उपाध्यक्ष म्हणून तिची नियुक्ती करण्यात आली आहे. तिच्याविरुद्ध काँग्रेसकडून लढणाऱ्या कुलदीप यांनी 2014 च्या निवडणुकीत स्वतंत्र पक्ष स्थापन करून निवडणूक लढली होती.

VIDEO : जेसीबी घेऊन उधळला गुलाल, सेनेच्या मंत्र्याला पराभूत केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते जल्लोष

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: BJPharyana
First Published: Oct 25, 2019 09:17 AM IST

ताज्या बातम्या