मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO काढता काढता अचानक वाघ समोरच आला आणि... धडकी भरवणारं दृश्यं

VIDEO काढता काढता अचानक वाघ समोरच आला आणि... धडकी भरवणारं दृश्यं

वाघाला पाहताच पर्यटक मोठमोठ्याने ओरडू लागला आणि दूर असलेला वाघ (Tiger) अचानक त्यांच्या जवळ आला. पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा.

वाघाला पाहताच पर्यटक मोठमोठ्याने ओरडू लागला आणि दूर असलेला वाघ (Tiger) अचानक त्यांच्या जवळ आला. पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा.

वाघाला पाहताच पर्यटक मोठमोठ्याने ओरडू लागला आणि दूर असलेला वाघ (Tiger) अचानक त्यांच्या जवळ आला. पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 22 जानेवारी : जंगल सफारी (Jungle Safari)  करताना किंवा नॅशनल पार्कमध्ये गेल्यावर एखादा हिंस्र प्राणी समोर आल्यावर धडकीच भरते, अंगाला घामही फुटतो. काही लोक अशा प्राण्यांना पाहून एकतर उत्साहात किंवा भीतीनं मोठमोठ्यानं ओरडतात. तर काहींची बोलतीच बंद होते. परिस्थिती कशीही असली तरी त्या प्राण्याचा फोटो, व्हिडीओ काढण्याचा मोह आवरत नाही. त्या प्राण्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (viral) होतो आहे. ज्यामध्ये काही लोक वाघाला आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करत होतो तितक्यात वाघच त्यांच्यासमोर येतो.

जंगल सफारीचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहाल तर तुम्हाला धडकीच भरेल. आयएफएस अधिकारी सुसांत नंदा  (Susanta Nanda) यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटवरवर पोस्ट केला आहे.

व्हिडीओत पाहू शकता पर्यटकांनी भरलेल्या दोन गाड्या एकामागोमाग एक उभ्या आहेत. त्यांना तिथं एक वाघ दिसतो त्याला पाहताच पर्यटक गाडीत उभे राहतात आणि आपल्या हातात मोबाइल घेऊन वाघाचा व्हिडीओ काढू लागतात. इतक्यात त्यांच्यापासून काही अंतरावर असलेला हा वाघ ते पाहतो आणि तो थेट त्यांच्याजवळच येतो. तिथल्या छोट्याशा भिंतीवर वाघ अचानक येऊन उभा राहतो आणि पर्यटकांकडे रागानं पाहतो आणि पर्यटकांचा आवाज कमी होताच त्यांना काहीही न करता आपल्या मार्गानं निघून जातो.

हे वाचा - VIDEO काढण्याच्या नादात बिबट्याच्या जवळ गेला तरुण आणि... काळजाचा ठोका चुकवणारं दृश्यं

पर्यटक इतक्या मोठ्यानं ओरडत असतात की वाघाला ते सहन होत नाही आणि त्यांना गप्प करण्यासाठीच जणू तो त्यांच्या दिशेनं धावत येतो आणि पर्यटक शांत होताच तिथून स्वतःही शांतपणे निघून जातो.

हा व्हिडीओ शेअर करताना सुशांत नंदा यांनी पर्यटकांना मूर्ख म्हटलं आहे. जेव्हा माणसांचा मेंदू बंद होतो आणि तोंड सुरू राहतं. पण वाघानं ज्या पद्धतीनं आपल्या रागावर नियंत्रण ठेवलं त्याला दाद द्यायला हवी. पण भविष्यात असं होईलच असं नाही.  हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्सच्यादेखील अशाच प्रतिक्रिया येत आहेत. लोकांनी या पर्यटकांवर राग व्यक्त केला आहे.

हे वाचा - डरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO

याआधीदेखील असाच एक बिबट्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. गाड्यांमधून बाहेर येऊन अगदी बिबट्याच्या जवळ जाऊन लोक त्याचे फोटो, व्हिडीओ काढू लागले. एक तरुण तर त्या बिबट्याच्या मागे मागे फिरत होता. ते पाहून बिबट्या त्या तरुणाच्या दिशेनंही येतो. पण काही वेळानं तो तिथून निघून जातो.

First published:

Tags: Social media viral, Tiger, Tiger attack, Viral, Viral videos, Wild animal