मराठी बातम्या /बातम्या /Viral /

हॉटेलमध्ये रंगला Dance India Dance; वेटरचा डान्स पाहून लोक जेवायचं विसरले, तुम्हीही पाहा VIDEO

हॉटेलमध्ये रंगला Dance India Dance; वेटरचा डान्स पाहून लोक जेवायचं विसरले, तुम्हीही पाहा VIDEO

सोशल मीडियावर सामान्य लोकांमधलं भन्नाट टॅलेंट व्हायरल होत असतं. असाच एका वेटरचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.

सोशल मीडियावर सामान्य लोकांमधलं भन्नाट टॅलेंट व्हायरल होत असतं. असाच एका वेटरचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.

सोशल मीडियावर सामान्य लोकांमधलं भन्नाट टॅलेंट व्हायरल होत असतं. असाच एका वेटरचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.

  • Published by:  News18 Desk

गुवाहाटी, 12 फेब्रुवारी : टायगर श्रॉफ (Bollywood actor Tiger Shroff) हा नव्या पिढीचा लोकप्रिय अभिनेता. टायगरने चाहते त्याच्या भन्नाट डान्सिंग स्किल्सचे (dancing skills)  चाहते आहेत. त्याचा डान्सची शैलीच इतरांहून एकदम वेगळी आहे. त्याच्या मुव्ह्ज, देहबोली आणि हावभाव यांना तोड नसते. टायगर अनोखा असला तरी त्याचे चाहतेही काही कमी नाहीत.

टायगरच्या चाहत्यांचा एक भन्नाट व्हिडिओ सध्या वेगानं व्हायरल (video viral) होतो आहे. हा चाहता गुवाहाटीचा (Guwahati) आहे. तो व्यवसायानं वेटर (waiter) आहे. त्यानं टायगरच्या बागी (Baaghi) या सिनेमातल्या एका गाण्यावर (song) मस्त डान्स केला आहे. हा डान्स करण्याची त्याची शैली एकदमच प्रोफेशनल (professional style) आहे.

एका रेस्टॉरन्टमध्ये  (restaurant) ग्राहक (customers) बसलेले आहेत. तेव्हा हा वेटर अचानक तिथं येत डान्स करणं सुरू करतो. हा डान्स इतका आकर्षक आहे, की सगळे लोक जेवण सोडून त्याला पाहत बसले आहेत. कोण शिट्ट्या वाजवत आहे, कोण टाळ्या.

" isDesktop="true" id="520972" >

सध्या सोशल मीडियावर हा वेटर एकदम व्हायरल झाला आहे. या तरुणाचं नाव आहे सुरजित त्रिपुरा(Surjit Tripura). सध्या यानं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लोक याचं भरभरून कौतुक करत आहेत. असा परफॉर्मन्स पूर्वी कधीच पाहिला नसल्याचं लोक म्हणत आहेत. सुरजित मात्र पूर्वीपासूनच असा डान्स करत आला आहे असं सांगितलं जातं आहे. आपल्या कामासोबतच तो हा छंद जोपासत असतो.

हेही वाचा ‘हीच खरी भारतीय संस्कृती’; 'त्या' फोटोवरून मिलिंद सोमणचं ट्रोलर्सना प्रत्युत्तर

आता हा डान्स खुद्द टायगर श्रॉफपर्यंत पोचतो का? पोचल्यास तो त्यावर काय प्रतिक्रिया देतो याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. टायगरने अनेक चाहते आपले व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. त्यांना अपेक्षा असते की टायगरनंही आपला व्हिडिओ पाहावा आणि काहीतरी कमेंट करावी.

First published:

Tags: Tiger Shroff, Viral video.