मराठी बातम्या /बातम्या /Viral /...अन् छोट्याशा बछड्यासमोर वाघिणीची हवा टाईट; नेमकं काय घडलं पाहा VIDEO

...अन् छोट्याशा बछड्यासमोर वाघिणीची हवा टाईट; नेमकं काय घडलं पाहा VIDEO

स्वतःच्याच बछड्याला घाबरली वाघिण असं नेमकं झालं तरी काय?

स्वतःच्याच बछड्याला घाबरली वाघिण असं नेमकं झालं तरी काय?

स्वतःच्याच बछड्याला घाबरली वाघिण असं नेमकं झालं तरी काय?

मुंबई, 06 जुलै : वाघ-वाघीण (Tiger video) ज्यांना भलेभले प्राणी घाबरतात. पण अशाच एका वाघिणीची चक्क तिच्या बछड्यामुळेच हवा टाईट झाली आहे. कोणत्याही प्राण्याला न घाबरणारी ही वाघीण आपल्या बछड्याला घाबरली. वाघ आणि बछड्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Tiger cube video).

माणसांची मुलं जशी खोडकर, मस्तीखोर असतात अगदी तसेच प्राण्यांचेही असतात. वाघ कितीही भयंकर वाटला तरी त्यांचे बछडे पाहताच क्युट वाटतात. त्यांच्या लिलाही पाहण्यासारख्या असतात. या व्हिडीओतही या बछड्याने असंच काही क्युट केलं. पण त्यामुळे त्याच्या आईला मात्र मोठा धक्का बसला.

हे वाचा - जंगलाच्या रस्त्यावर गाडीतून उतरली महिला; दुसऱ्याचं क्षणी वाघाने जबड्यात पकडून फरफटत नेलं, भयानक VIDEO

व्हिडीओत पाहू शकता एक पांढरी वाघिण दिसते आहे. तिच्यामागे एक बछडाही दिसतो आहे. बछडा आधी हळूच डोकावत आपल्या आईकडे पाहतो. त्याच्या आईचं मात्र त्याच्याकडे लक्ष नसतं. किंबहुना आपला बछडा आपल्यामागे आहे, याची कल्पनाच तिला नसते.

त्यानंतर बछडा अचानक बाहेर येतो आणि आईवर धावत येत मोठ्याने ओरडते. त्यावेळी बेसावध असलेली वाघीण घाबरते. ती दचकून धाडकन जमिनीवर कोसळते. कुणी दुसरा प्राणी आपल्यावर हल्ला करायला आलं असंच तिला वाटतं. पण हा आपलाच बछडाच आहे हे ती पाहते तेव्हा तीसुद्धा थोडी हैराण होते.

हे वाचा - Viral Video: डेंजर! झाडाखाली झोपलेल्या वाघाला कुत्र्यानं दिलं आव्हान; फक्त 8 सेकंदातच संपवला खेळ

इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहे.

First published:
top videos

    Tags: Viral, Viral videos, Wild animal