मुंबई, 28 जानेवारी : वाघ, सिंह, चित्ता, बिबट्या असे प्राणी पाहण्याची हौस अनेकांना असते. त्यासाठी किती तरी लोक प्राणीसंग्रहालय, जंगल सफारीवर जातात. पण जितका उत्साह या प्राण्यांना पाहण्याचा असतो त्यापेक्षा कितीतरी जास्त भीती ते समोर दिसल्यानंतर वाटते. असे प्राणी अचानक तुमच्या अगदी जवळ आले तर काय होईल? फक्त कल्पनेनंच तुमच्या अंगावर काटा आला असेल. पण असं प्रत्यक्षात घडलं आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
जंगल सफारी, प्राण्यांचे बरेच व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. पण हा व्हिडीओ पाहून तुमच्या काळजाचा ठोकाच चुकेल. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता जंगलात एक पर्यटकांनी भरलेली गाडी थांबली आहे. समोरून एक भलामोठा वाघ येतो. वाघाला पाहून आपल्यालाही घाम फुटतो.
वाघ पर्यटकांच्या गाडीच्या जवळ येतो. ड्रायव्हिंग सीटच्या जवळ जाऊन तो तिथला आरसा खाण्याचा प्रयत्न करताना दिसतो. तिथली खिडकीही खुली आहे. पण सुदैवाने पुढे कुणी बसलेलं नाही. भीतीने सर्वजण गाडीच्या मागे गेले आहेत आणि तिथूनच या वाघाला आपल्या कॅमेऱ्यात कैद करत आहेत. वाघाला पाहिल्यावर तो भुकेला असावा असं दिसतो.
काही वेळाने तो गाडीच्या मागच्या बाजूने जातो. गाडी पूर्ण खुली आहे. तिथं एक पर्यटक बसला आहे. वाघ त्याच्या जवळ जातो. गाडी खोलण्याचा, गाडीत घुसण्याचा तो प्रयत्न करतो. यावेळी मात्र त्या पर्यटकाची हवा चांगलीच टाइट झाली आहे. पर्यटक कसला फक्त व्हिडीओ पाहून आपल्यालाही घाम फुटला आहे. इतका या व्हिडीओचा शेवट धक्कादायक आहे.
wildtrails.in इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना धडकी भरली आहे. एका युझरने असं वाटतं हे सर्व सुसाइड मिशनवर आहेत. तर एकाने पर्यटकांचा तर जीवच गेला असेल, असं म्हटलं आहे. एका युझरने हा वाघ किती मोठा आणि भयानक आहे, असं म्हटलं आहे.
View this post on Instagram
तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tiger, Viral, Viral videos, Wild animal