मराठी बातम्या /बातम्या /Viral /नशीब बलवत्तर! वाघाने मोरावर हल्ला केला खरा पण पुढे असं काही झालं की... पाहा VIDEO

नशीब बलवत्तर! वाघाने मोरावर हल्ला केला खरा पण पुढे असं काही झालं की... पाहा VIDEO

कधी मोर आणि वाघाची झुंपल्याचं पाहिलंय का? भारताचे दोन प्रमुख प्राणी-पक्षी आमने-सामने आल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

कधी मोर आणि वाघाची झुंपल्याचं पाहिलंय का? भारताचे दोन प्रमुख प्राणी-पक्षी आमने-सामने आल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

कधी मोर आणि वाघाची झुंपल्याचं पाहिलंय का? भारताचे दोन प्रमुख प्राणी-पक्षी आमने-सामने आल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

नवी दिल्ली, 21 जुलै : अनेक प्राण्यांना जंगलात राहताना मोठा संघर्ष करावा लागतो. कधी अन्नासाठी तर कधी लहान प्राण्यांना इतर मोठ्या प्राण्यांपासूनही सावध राहताना संघर्ष करावा लागतो. प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण कधी मोर आणि वाघाची झुंपल्याचं पाहिलंय का? असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. भारताचे दोन प्रमुख प्राणी-पक्षी आमने-सामने आल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

मोराचा थेट वाघाशी सामना -

व्हायरल व्हिडीओमध्ये असं दिसतंय, एक मोर चुकून जवळचं झोपलेल्या वाघाला उठवतो. मोराच्या आवाजाने वाघाची गाढ झोप मोडते. झोप मोड झाल्याने चिडलेल्या वाघाने काही समजायच्या आतच अचानक मोरावर हल्ला केला. नकळतपणे वाघाला त्याच्या गाढ झोपेतून उठवून, त्याच्या जवळपास फिरणाऱ्या मोराला त्याच्यावर अशाप्रकारे हल्ला होईल याची कोणतीच कल्पना नसते. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.

(वाचा - बापरे! Hello Brother म्हणत चक्क वाघाशी मैत्री करायला गेला आणि...; पाहा VIDEO)

वाघ हल्ला करण्यासाठी जसं पुढे पळत येतो, तसं मोराला वाघाची जाणीव होते आणि ते आपले पंख फडफडवत उडून जातात. हा व्हायरल व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांकडून विविध कंमेंट केल्या जात आहेत. काही युजर्सनी इतक्या जवळ जाऊनही वाघाच्या तावडीत न सापडल्याने मोराचं नशीब बलवत्तर असल्याचं म्हटलं असून आश्वर्च व्यक्त केलं आहे.

" isDesktop="true" id="582504" >

इंडियन बीकीपर्स चॅनेलकडून यूट्यूबवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. आतापर्यंत 90000 हून अधिक वेळा वाघ आणि मोराचा हा आमना-सामना लोकांनी पाहिला आहे.

First published:
top videos

    Tags: Viral video.