मराठी बातम्या /बातम्या /Viral /

म्हशीवर हल्ला करण्यासाठी आला वाघ अन्..; पाहा पुढे काय घडलं, शिकारीचा Live Video

म्हशीवर हल्ला करण्यासाठी आला वाघ अन्..; पाहा पुढे काय घडलं, शिकारीचा Live Video

व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video of Tiger and Buffalo Fight) पाहायला मिळतं, की म्हशीला आपली शिकार बनवण्यासाठी वाघ तिच्यावर नजर ठेवून आहे

व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video of Tiger and Buffalo Fight) पाहायला मिळतं, की म्हशीला आपली शिकार बनवण्यासाठी वाघ तिच्यावर नजर ठेवून आहे

व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video of Tiger and Buffalo Fight) पाहायला मिळतं, की म्हशीला आपली शिकार बनवण्यासाठी वाघ तिच्यावर नजर ठेवून आहे

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 20 डिसेंबर : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) आपल्या प्रोफेशनल लाईफसोबतच खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतो. मात्र आज तो प्रोफेशनल किंवा खासगी आयुष्यामुळे नाही तर एका व्हिडिओमुळे चर्चेत आहे, जो त्याने आपल्या इन्स्टाग्राम (Instagram Video) अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

आपल्या सर्वांना माहिती आहे की जंगलाच्या दुनियेत प्राण्यांना जिवंत राहण्यासाठी शिकारीवरच अवलंबून राहावं लागतं. अनेकदा शिकारीचे असे व्हिडिओ समोर येतात, जे हैराण करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

घरात एकटा असताना नवऱ्याचा 'नको तो उद्योग'; CCTV फुटेज पाहून बायकोही शॉक

व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video of Tiger and Buffalo Fight) पाहायला मिळतं, की म्हशीला आपली शिकार बनवण्यासाठी वाघ तिच्यावर नजर ठेवून आहे. संधी मिळताच हा वाघ शिकारीच्या मागे धावू लागतो. पाहता पाहता दोघांमध्ये जणू पकडापकडीचा खेळ सुरू होतो. वाघ शिकारीसाठी म्हशीच्या मागे धावताना दिसतो, तर म्हैसही आपला जीव वाचवण्यासाठी जीव मुठीत घेऊन पळताना दिसते. मात्र काहीच वेळात दोघेही कॅमेऱ्यात दिसायचे बंद होतात.

हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, हाच तर जंगलाचा नियम आहे. इथे कधी काय घडेल हे सांगता येत नाही. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, दोघांचा हा पकडापकडीचा खेळ अतिशय मजेशीर आहे. याशिवायही अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.

बायकोला देणारे होता सरप्राईज गिफ्ट, हातावर टॅटू काढताना झाला मोठा पोपट

आतापर्यंत हा व्हिडिओ 1 लाख 87 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. काहीच तासात या व्हिडिओला अनेक व्ह्यूज मिळाले आहेत. रणदीप हुड्डाने हा व्हिडिओ शेअऱ करत कॅप्शनमध्ये लिहिलं, माझा पहिला टायगर हंट. या व्हिडिओवर आता नेटकरीही भरपूर कमेंट करत आहेत.

First published:

Tags: Shocking video viral, Tiger attack, Wild animal