Home /News /viral /

वाघाच्या मावशीचा दरारा! घाबरून वाघोबाही मागे पळाला; VIDEO VIRAL

वाघाच्या मावशीचा दरारा! घाबरून वाघोबाही मागे पळाला; VIDEO VIRAL

वाघ आणि वाघाची मावशी आमनेसामने आले आणि...

    मुंबई, 25 सप्टेंबर : मांजराला (Cat) वाघाची मावशी म्हटलं जातं. हीच वाघाची मावशी आणि वाघ (Tiger) जर समोरासमोर आले तर काय होईल... साहजिकच वाघासमोर वाघाच्या मावशीचं (Cat and lion) काही चालणार नाही, असंच कुणालाही वाटेल. पण सोशल मीडियावर अशाच वाघाच्या मावशीचा आणि वाघोबाचा व्हिडीओ (Cat and lion video) व्हायरल (Social media viral video) होतो आहे. ज्यात या दोघांचा सामना झाल्यानंतर नेमकं काय होतं, ते तुम्ही पाहू शकता. वाघ आणि मांजर समोरासमोर असतील तर आपण म्हणू आधीच भित्रं असलेलं मांजरच त्याला घाबरेल. पण या व्हिडीओत मात्र उलटचं झालं. भलामोठा वाघच छोट्याशा मांजराला घाबला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. आता असं या मावशीने वाघासोबत नेमकं केलं तरी काय पाहुया. beautiful_pix4 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता, वाघ आणि मांजर समोरासमोर आहेत. वाघ पिंजऱ्याच्या आत आणि मांजर पिंजऱ्याबाहेर बसले आहे. दोघंही एकमेकांना आधी पाहत राहतात. वाघ आपलं तोंड मांजराजवळ नेतो. तेव्हा मांजर आपलं डोकं पटकन वर काढते आणि वाघाला घाबरवते. जणू काही ती वाघावर हल्लाच करते आहे. तेव्हा वाघही दचकतो. तो अक्षरशः घाबरतोच आणि मागे पळतो. मांजरापासून दोन पावलं तो मागेच जातो. त्यामुळे मांजराला कमजोर समजू नका. वाघ वाघ असेल पण ती वाघाची मावशी आहे जी वाघापेक्षा कमी नाही, हेच या व्हिडीओत दिसून येतं. हे वाचा - चवताळलेली मगर पाण्यातून बाहेर रस्त्यावर आली आणि...; धडकी भरवणारा VIDEO याआधी असाच एक सिंह आणि मांजराचीही व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात मांजराची शिकार करायला आलेला सिंह रिकाम्या हातीच मागे परतला. Mack & Becky Comedy ट्विटवर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. घराच्या बाहेर सिंह आहे. काचेचा दरवाजा बंद आहे. सिंह त्यावर आपला पंजा फिरवून मांजरीला पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं आहे. तो काचेचा दरवाजा उघडण्याचाही प्रयत्न करताना दिसतो. मांजरीला पाहून जोरजोरात डरकाळ्याही फोडतो. तर दुसरीकडे मांजर मात्र घरात निवांत बसून सिंहाची जणू मजाच पाहत राहते. हे वाचा - OMG! 1-2 नाही डझनभर महाकाय अजगरांनी घातला विळखा; जरा जपून पाहा हा खतरनाक VIDEO अखेर काय, सिंह काही दरवाजा उघडण्यात यशस्वी होत नाही. अगदी शिकार समोर असूनही त्याला शिकार काही करता येत नाही. मग काय बिचारा सिंह आल्या पावली तसाच माघारी परततो. रिकाम्या हाती, उपाशी पोटीच त्याला परतावं लागलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Funny video, Viral, Viral videos, Wild animal

    पुढील बातम्या