कर्माचे फळ! कार चोरायला आला पण आता तोंड दाखवणंही झालं अवघड, VIDEO VIRAL

चोरी करायला आल्यावर त्यानं कारवर विट फेकली पण त्याला कारनेच असा काही दणका दिला की आयुष्यात पुन्हा कारकडे बघण्याचं धाडस होणार नाही.

News18 Lokmat | Updated On: Oct 17, 2019 10:41 AM IST

कर्माचे फळ! कार चोरायला आला पण आता तोंड दाखवणंही झालं अवघड, VIDEO VIRAL

नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : वाईट कर्माचं फळ वाईटच मिळतं. काम केल्यावर लगेच नाही तर काही काळाने तरी ते भोगायला लागतं असं अनेकदा आपण ऐकतो. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये कार चोरी करणाऱ्याला त्याचवेळी असा काही दणका बसला की पुन्हा त्याला कारकडे बघण्याचंही धाडस होणार नाही. एक मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये एक चोर कारवर विट फेकतो. ती विट कारवर आदळून त्या चोराच्या चेहऱ्यावर लागते. त्यानंतर चोर वेदनेनं विव्हळतो. द सनने याबाबतचं वृत्त दिलं असून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं सीसीटीव्ही फूटेज डरहममधील ब्रॅडन इथलं आहे. 5 ऑक्टोबरला कार चोरीचा प्रयत्न करत असलेल्या चोराचं कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झालं होतं.

फेसबुकवर कारमालक मार्टिन क्रेगने शेअऱ केलं आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हुडी जॅकेट घालून कारवजवळ येतो. इकडे तिकडे पाहिल्यानंतर विट उचलतो. त्यानंतर कारवर इतक्या जोरात विट फेकतो की ती विट कारवर आदळून चोराच्या चेहऱ्यावर लागते. त्यानंतर वेदनेनं विव्हळत त्याला काढता पाय घ्यावा लागतो.

व्हिडिओ शेअर करताना मार्टिनने म्हटलं की, भल्या माणसानं माझ्या कारचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला. पण अनेक प्रयत्नांनतरही तो अयशस्वी झाला. त्याला त्याच्या कर्मांची शिक्षा मिळाली आणि त्याच्या चेहऱ्यावर परिणाम झाला.

एक आठवड्यातच हा व्हिडि जगभरात व्हायरल झाला. दरम्यान, कार चोरीच्या उद्देशानं आलेल्या त्या व्यक्तीला अटक करण्यात आल्याचं वृत्त मिररने दिलं आहे. वाहनाचं नुकसान केल्याप्रकरणी त्याला अटक केली आहे. त्याला 7 नोव्हेंबरमध्ये न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Loading...

VIDEO : '... म्हणून शरद पवारांना ईडीची नोटीस', मुख्यमंत्री फडणवीस यांचा गौप्यस्फोट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: car
First Published: Oct 17, 2019 10:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...