Home /News /viral /

स्टेजवर थरारक एन्ट्री करणं पडलं महागात; उंचावरुन नवरा-नवरी पडले खाली, Shocking Video

स्टेजवर थरारक एन्ट्री करणं पडलं महागात; उंचावरुन नवरा-नवरी पडले खाली, Shocking Video

नव्या ट्रेंडनुसार लग्नाची व्याख्याही बदलली आहे. आजकाल लग्नात भरपूर खर्च केला जातो, शिवाय लग्नात नवरा-नवरीच्या एन्ट्रीचीही खूप तयारी केली जाते. अशाच या लग्नातून धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

    रायपूर, 12 डिसेंबर : छत्तीसगडची (Chhattisgarh News) राजधानी रायपूरमधून एक अत्यंत हैराण (Shocking News) करणारी घटना समोर आली आहे. येथे एका लग्न सोहळ्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली. हॉटेलमध्ये या लग्नाचा जंगी सोहळ्याचं आयोजन केलं होतं. यावेळी एक मोठी दुर्घटना घडली. दोघेही स्टेजवर अनोख्या पद्धतीने एन्ट्री घेत होते. मात्र यादरम्यान हार्नेस तुटल्यामुळे नवरा-नवरी दोघेही स्टेजवर पडले. सुदैवाने यात दोघेही फार जखमी झाले नाहीत. या प्रकरणात इव्हेंट कंपनीने आपली चूक मान्य केली आहे. मात्र अद्याप या प्रकरणात पोलिसात तक्रार करण्यात आलेली नाही. ही घटना तेलाबांधा भागातील असून सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 12 फूट उंगीवरुन खाली पडले नवरा-नवरी.. नवरा-नवरीला हार्नेसच्या मदतीने स्टेजवर आणलं जात होतं. मात्र हार्नेस अचानक तुटल्यामुळे नवरा-नवरी 12 फूट उंचीवरुन खाली पडले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हे ही वाचा-नवरदेवाची मस्ती नवरीला पडली महागात; मंडपातच धाडकन तोंडावर आपटली अन्..., VIDEO नवरा-नवरीला काहीसं खरचटलं आहे. या घटनेनंतर लग्नात आलेले पाहुणे संतापले आणि त्यांनी इव्हेंट कंपनीवर राग व्यक्त केला.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Chattisgarh, Marriage, Shocking video viral

    पुढील बातम्या