जलप्रलयातून तिघांची केली सुटका; जवान हेलिकॉप्टरमधून एअरलिफ्ट करतानाचा अंगावर काटा आणणारा VIDEO

जलप्रलयातून तिघांची केली सुटका; जवान हेलिकॉप्टरमधून एअरलिफ्ट करतानाचा अंगावर काटा आणणारा VIDEO

एकीकडे कोरोना तर दुसरीकडे पाऊस...अशात अडकलेल्या तिघांचे जवानांनी प्राण वाचवले आहेत

  • Share this:

30 ऑगस्ट, भोपाळ : एकीकडे देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. तर दुसरीकडे अनेक राज्यांना पावसाने झोडपलं आहे. त्यामुळे लोकांच्या संकटात अधिक वाढ झाली आहे. मध्य प्रदेशात पावसाचा कहर सुरू आहे. येथील पूर्वेकडील भागात अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पूरामुळे राज्यातील 9 जिल्ह्यातील 394 हून जास्त गावांवर संकट ओढवलं आहे.

त्यानंतर आज मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पूरपरिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहिती दिली. येथीन वैनगंगा नदीतून पाणी गावांमध्ये शिरले, त्यातून या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

आतापर्यंत 7000 जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं आहे. छिंदवाड्यातील पूरात अडकलेल्या 5 लोकांना हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करण्यात आलं. होशंगाबाद, सीहोर आणि रायसेन जिल्ह्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. येथे बचावकार्यासाठी वायुसेनेचे जवान आले आहेत. अनेकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 30, 2020, 5:28 PM IST

ताज्या बातम्या