अनंतनाग, 25 मे : एका मशिदीचं बांधकाम
(construction mosque tower) सुरू असताना विचित्र अपघात घडला आहे. मशिदीच्या मिनाराचं काम सुरू असताना तीन लोक अचानक खाली कोसळले. या घटनेचा LIVE VIDEO कुणीतरी सोशल मीडियावर शेअर केला आणि आता तो व्हायरल झाला आहे. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे.
काश्मीरमध्ये मोहरीपोरा अनंतनाग
(Mohripora Anantnag) येथे मशिदीचं काम सुरू असताना हा अपघात घडला. यामध्ये दोघेजण चांगलेच जखमी झाले आहेत. या प्रकारामुळं काही काळ परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. काश्मीरच्या या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर काही काळातच तो व्हायरल झाला.
या व्हिडिओत दोन मिनार दिसत आहेत. या दोन्ही मिनारावर मिळून पाच ते सहा लोक दिसत आहेत.
बांधकामाच्या कामानिमित्त वर चढल्याचे दिसत आहे. अलिकडील मिनारावर उभ्या असलेल्या तीन लोकांपैकी एकजण खाली उतरत असताना अचानक बांधकामासाठी बांधलेली लाकडं खाली निघून पडली त्यामुळं ते तिघेही क्षणार्धात खाली कोसळले.
हे वाचा -
‘मैं आपको उडा डालूंगा’, नागपूरच्या ‘त्या’ क्युट चिमुकल्याचा केस कापताना नवा VIDEO पाहिलात का?
यातील दोघेजण वरच्या टप्प्यावर अडकून राहिले, मात्र एकजण थेट खाली पडल्याचं दिसत आहे. ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.