Home /News /viral /

पॅरासेलिंगदरम्यान हवेत असताना अचानक दोरी निसटली अन्...; तिघे गंभीर, थरकाप उडवणारा Video

पॅरासेलिंगदरम्यान हवेत असताना अचानक दोरी निसटली अन्...; तिघे गंभीर, थरकाप उडवणारा Video

या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

    अहमदाबाद, 23 मे : आजकाल एडव्हेंचर करणं फॅशन बनलं आहे. त्यातून अनेक पर्यटनस्थळी पॅराग्लाइडिंग, पॅरासेलिंग, वोटिंग यांची सुरुवात करण्यात आली आहे. मात्र अनेकदा यातून भयंकर अपघात घडू शकतो. अशीच एक घटना दमनमधील जंपोर येथून समोर आली आहे. येथील समुद्राजवळ पॅरासेलिंगदरम्यान एका अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले. पॅरासेलिंग करीत असताना तीन पर्यटक तब्बल 100 फुटावरुन खाली पडले. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तीन पर्यटक पॅराशूटवरुन टेक ऑफ केल्याच्या काही सेकंदात जमिनीवर कोसळतात. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पॅरोशूटची रश्शी एका बाजूने निघाली, त्यामुळे नियंत्रण गमावल्याने तिघे खाली पडले. साधारण 30 सेकंदाच्या या व्हिडीओत पर्यटक या एडव्हेंचरसाठी खूप उत्साही होते. तिघेही पॅराशूटसह वर उडतात. यानंतर हवेच्या दबावामुळे पॅरोशूट टर्न होतं. यानंतर तिघेही जमिनीवर कोसळतात. तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात दीवमधूनही अशीच एक घटना समोर आली गोती. यात नगवा बीचवर पॅरासेलिंगदरम्यान पॅराशूटची रश्शी अचानक तुटल्याने एक दाम्पत्य समुद्रात पडले. गुजरातमधील जुनागड येथील हे दाम्पत्य सुट्ट्यांसाठी दीव आयलँडवर गेले होते. सुदैवाने यातून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं होतं.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Shocking video viral

    पुढील बातम्या