Home /News /viral /

लग्नाच्या तीन दिवस आधी नवरीला झाला कोरोना; तरीही पठ्ठ्याने जुगाड लावून केलं लग्न

लग्नाच्या तीन दिवस आधी नवरीला झाला कोरोना; तरीही पठ्ठ्याने जुगाड लावून केलं लग्न

खरं प्रेम (True Love) असेल तर तुम्हाला कोणीही आडवू शकतं नाही याचं उत्तम उदाहरण म्हणून या लग्नाकडे पाहिले जात आहे. कारण लग्नाच्या केवळ तीन दिवस आधी नवऱ्या मुलीला कोरोनाची बाधा झाली होती.

    न्यूयॉर्क, 04 डिसेंबर: अमेरिकेतील (US) कॅलिफोर्नियामध्ये एक अजब लग्नसोहळा पार पडला आहे. जो सोशल मीडियात (Social Media) प्रचंड व्हायरल (Viral) होताना दिसत आहे. खरं प्रेम (True Love) असेल तर तुम्हाला कोणीही आडवू शकतं नाही याचं उत्तम उदाहरण म्हणून या लग्नाकडे पाहिले जात आहे. कारण लग्नाच्या केवळ तीन दिवस आधी नवऱ्या मुलीला कोरोनाची बाधा झाली होती. अशात लग्न होणे कठीण वाटत होते. पण नवऱ्या मुलाने हार मानली नाही. त्याने जुगाड लावून त्याच दिवशी आपल्या प्रेमिका सोबत लग्न केले. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहेत. कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या पॅट्रिक डेलगॅडो (Patrick Delgado)आणि लॉरेन जिमेनेझ (Lauren Jimenez) या दोघांनी लग्नाची सर्व तयारी केली होती. पण त्याआधी दोघांनाही धक्का बसला. कारण लग्नाच्या केवळ तीन दिवस आधी लॉरेनला कोरोना झाल्याचं उघड झालं. तिची कोरोना चाचणी सकारात्मक आल्या सर्वांचा भ्रमनिराश झाला. पण त्याच दिवशी दोघांनाही लग्न करायचे होते आणि त्यांनी अजब जुगाड लावला आणि त्याच दिवसी लग्न केलं. हे वाचा-जे कित्येक मुलींना सहज जमत नाही ते गायींनं करून दाखवलं, पाहा VIDEO व्यवसायाने छायाचित्रकार असणाऱ्या जॅक्सनने या अनोख्या लग्नाची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. यामध्ये जॅक्सनने लिहिले की, 'लग्नाच्या आदल्या दिवशी जर तुमची कोरोना टेस्ट सकारात्मक आली, तर तुम्ही काय कराल? एकतर तुम्हाला क्वारंटाइन व्हावं लागेल किंवा लग्न केव्हा होईल हेही कळणार नाही. पण कॅलिफॉर्नियातील एका जोडप्याने या सर्व प्रसंगावर मात देत एक वेगळीच शक्कल लढवत, आपला विवाहसोहळा सुंदररित्या पार पाडला आहे. विलगीकरण केलेले असूनही लॉरेन जिमेनेझने पॅट्रिकशी कसं लग्न केलं ते जाणून घेऊया. पहिल्या मजल्यावर होती नवरी आणि नवरदेव खाली या चित्रांमध्ये दिसून येते की, वधू पहिल्या मजल्यावर खिडकीजवळ बसली आहे. आणि नवरा मुलगा जमिनीवर उभा आहे. या दोघांनी एकमेकांना दोरीने बांधले आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये जॅक्सनने सांगितलं की एवढ्या कठीण परिस्थितीतही या जोडप्याने अंगठी कशी बदलली आणि ऐकमेकांविषयी असलेली प्रेम भावना कशी व्यक्त केली.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Viral video.

    पुढील बातम्या