नवी दिल्ली, 9 जून: यूट्यूबवर (YouTube) सध्या विविध प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. कॉमेडीपासून ते डान्सपर्यंत प्रत्येक प्रकारचा मसाला येथे पाहायला मिळतो. इतकच नाही तर यूट्यूबच्या जगात अनेक सुपरस्टारदेखील आहेत. ज्यांना लाखो-कोटींमध्ये व्ह्यूज मिळतात. यूट्यूबवर शिरूश्री सेकिया (Shirushree Saikia) हिचा एक व्हिडीओ असून यात तिने धमाकेदार डान्स केला आहे. डान्सचा हा फॉर्म तांडव आहे.
शिरूश्री सेकिया (Shirushree Saikia Dance Video) शिव ताण्डव स्तोत्रावर तांडव करताना दिसत आहे. शिरूश्री सेकिया (YouTuber Shirushree Saikia) हिचे हावभाव आणि डान्स करण्याचा अंदाज खूप कमाल आहे. हा डान्स व्हिडीओ डान्स अकॅडमीने सादर केला आहे. याचा कॉन्सेप्टआणि कोरियोग्राफी दोन्ही शिरूश्री सेकिया हिने केलं आहे. हा व्हिडीओ 15 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. .
हे ही वाचा-VIDEO : वाह काय गाणं वाजवलं! आजोबांचं व्हायोलिन स्क्लि पाहून आठवतील किशोर कुमार
शिरूश्री सेकिया (Shirushree Saikia) हिच्या या डान्स व्हिडीओवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत. एका फॅनने लिहिलं आहे की, मी पहिल्यांदा कोणाला इतक्या ऊर्जासह डान्स करताना पाहत आहे. तांडव हा महत्त्वाचा नृत्यप्रकार आहे. मात्र तो इतर नृत्यप्रकारांच्या तुलनेत फार प्रसिद्ध नाही. तांडव या नृत्यप्रकाराता उग्र हावभाव केले जातात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dance video, Social media, Viral video on social media, Viral video.