मराठी बातम्या /बातम्या /Viral /समुद्र किनारी प्री-वेडिंग फोटो शूट करीत होतं कपल आणि...VIDEO पाहून ह्रदयाच ठोका चुकेल!

समुद्र किनारी प्री-वेडिंग फोटो शूट करीत होतं कपल आणि...VIDEO पाहून ह्रदयाच ठोका चुकेल!

आपलं प्री-वेडिंग शूट सर्वात खास ठरावं यासाठी तरूण काय करतील याचा नेम नाही. आता असंच एक प्री-वेडिंग फोटो शूट व्हायरल झालं आहे.

आपलं प्री-वेडिंग शूट सर्वात खास ठरावं यासाठी तरूण काय करतील याचा नेम नाही. आता असंच एक प्री-वेडिंग फोटो शूट व्हायरल झालं आहे.

आपलं प्री-वेडिंग शूट सर्वात खास ठरावं यासाठी तरूण काय करतील याचा नेम नाही. आता असंच एक प्री-वेडिंग फोटो शूट व्हायरल झालं आहे.

हैद्राबाद, 7 फेब्रुवारी : आजकालच्या जोडप्यांमध्ये (couples) असलेली प्री-वेडींग शूटची (Pre-wedding shoot) मोठी क्रेझ आहे. दिवसेंदिवस याची क्रेझ वाढतेच आहे. आपलं शूट सर्वात आकर्षक आणि अनोखं ठरावं यासाठी जोडपी विविध प्रकारची शक्कल लढवत असतात. आता एका जोडप्यानं विचित्र म्हणावं असं फोटोशूट केलं आहे.

फोटोमध्ये आपण पाहू शकतो, की एक जोडपं पायांना झाडांच्या वेली बांधून समुद्राच्या (Sea) पाण्यात झोपलं आहे. त्याच्याभोवती कचरा विखुरलेला दिसतो आहे. होता. दोघांनाही कंबरेमध्ये एकत्र बांधलेलं आहे. हे दृश्य पाहून कुणाच्याही मनात पहिल्यांदा हाच विचार येईल ना, की हे एखादं प्रेमी जोडपं (lovers) आहे. जे आत्महत्या (suicide) करायला निघालं आहे. त्यासाठी त्यांनी एकत्र अशी कंबरेला दोरी बांधून घेत जीव दिला आहे. मृत्यूनंतर या दोघांचे मृतदेह (dead bodies) किनाऱ्यावर  वाहत आले असतील या कल्पनेनेच काळजात धस्सं होतं.

हे ही वाचा-नशा करणं पडलं महागात, वयाच्या 22 व्या वर्षी आलं म्हातारपण; पाहा PHOTOS

हा फोटो (photo) पाहिल्यावर बहुतेकजण अस्वस्थ होतात. मात्र हे अजिबात खरं नाही. हे कुठलं आत्महत्या केलेलं प्रेमी युगुल नाही. यांचा नुकताच साखरपुडा (engagement) झाला आहे. लवकरच त्यांचं लग्नही (marriage) होणार आहे. ते नवरा-बायको म्हणून नव्या जीवनात प्रवेश करणार आहेत. मात्र तरीही तुमचा विश्वास बसत नाहीय का? मग हा व्हिडीओ (viral video) बघा!

लग्नापूर्वी आपलं फोटोशूट बहुचर्चित ठरावं यासाठी या जोडप्यानं फोटोशूट केलं. आणि त्यावेळीच या सगळ्याचा व्हिडिओसुद्धा काढला गेला. व्हिडिओ बघून कळतं की हे प्री-वेडिंग शूट आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण म्हणत आहेत, की अशी विचित्र आणि भयानक कल्पना प्री-वेडिंग शूटसाठी अमलात आणण्याची काय गरज होती? अनेकजण या कल्पनेचं समर्थनही करत आहेत. अनेकजण याला वेडेपणा म्हणत आहेत. अर्थात, ही काही पहिलीच वेळ नाही. आजवर अनेकदा तरुणांनी विचित्र म्हणाव्या अशा कल्पना प्रीवेडिंग शूटसाठी प्रत्यक्षात आणल्या आहेत.

First published:

Tags: Sea, Suicide, Wedding couple