नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर : हिवाळ्याच्या (Winter) दिवसांत कंबळ घेऊन झोपायला कुणाला आवडत नाही. यामध्ये कंबळ (-blanket) जाड असेल तर आणखीनच मजा. परंतु खरेच जाड कंबळ असल्याने जास्त उब मिळते का ? यासाठी अनेक संशोधने झाली असून यामध्ये जाड कंबळ केवळ उबच देत नाही तर मानसिक दृष्ट्या देखील फायदा होत असल्याचे समोर आले आहे.
काय आहे कंबळ
या जाड कंबळला पाश्चिमात्य देशांमध्ये ग्रॅव्हिटी कंबळ देखील म्हटले जाते. या कंबळचा वापर आधी हॉस्पिटल आणि मनोचिकित्सा केंद्रावर केला जात असे. परंतु आता सर्व घरांमध्ये देखील याचा वापर होताना दिसून येत आहे. या कंबळचे वजन देखील असल्याने याचे तोटे देखील आहे. यामध्ये श्वास कोंडून मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे व्यक्तीच्या वजनांनुसार कंबळ तयार केले जाते. यामध्ये जेष्ठ नागरिकांसाठी, प्रौढ नागरिकांसाठी आणि लहान मुलांसाठी वेगवेगळ्या वजनाचे कंबळ तयार केले जातात. ऑटिस्टिक नागरिकांसाठी देखील वेगळ्या वजनाचे कंबळ तयार केले जातात.
हे ही वाचा-दिवाळीच्या दिवसात खरंच असा दिसतो भारत? NASA च्या फोटोमागील काय आहे सत्य
शोध सुरु आहेत
अमेरिकेतील मेसाचुसेट् मधील स्पायरल फाउंडेशनमध्ये यावर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले आहे. यामध्ये संशोधनाकर्त्यानी निष्कर्ष काढला, जड वजनाच्या कंबळामुळे केवळ उब मिळत नाही तर झोपदेखील उत्तम लागते. परंतु लहान मुलांसाठी याचे वजन जास्त होऊन श्वास कोंडून मृत्यू होण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. ऑक्युपेशनल थेरेपीमध्ये रुग्णाला वजनदार कंबळ ओढून घ्यायला सांगितले जाते.
वजनदार कंबळचे काही फायदे
ऑक्युपेशनल थेरेपीमध्ये रुग्णाला वजनदार कंबळ ओढून घ्यायला सांगितले जाते. यामुळे अपंग व्यक्ती किंवा मनोरुग्णांना यामुळे आराम मिळू शकतो. याच्या उब आणि वजनामुळे भावना नियंत्रित होण्यास मदत होते. यालाच डीप-टच प्रेशर देखील म्हटले जाते. यामध्ये उब आणि वजनामुळे सेरेटोनिन आणि डोपामिन हॉर्मोन तयार होतात. यामुळे हे ग्रॅव्हिटी कंबळ ओढून झोपल्याने उदासीनता, निद्रानाश, ऑब्सेसिव कम्पल्सिव डिसऑर्डर आणि मत्सर यातून आराम मिळतो.
हे ही वाचा-लग्नाच्या 5 वर्षांनंतरही पतीचा शारिरीक संबंधांसाठी नकार; व्हॉट्सअॅप पाहून हादरली
मानसिक रित्या आजारी रुग्णांना मिळतो आराम
ऑक्युपेशनल थेरेपीमध्ये 33 वयस्क नागरिकांवर संशोधन करण्यात आले. यामध्ये त्यांना 5 मिनिटांसाठी 13.6 किलो वजन असणारे कंबळ ओढून झोप घेण्यास सांगितले. यामध्ये जवळपास 85 टक्के नागरिकांनी त्यांना आराम मिळाल्याचे म्हटले. तर इतरांना या ब्लॅंकेटच्या आतमध्ये त्रास जाणवला. ऑस्ट्रेलेशियन साइकेट्रीमध्ये देखील या कंबळवर संशोधन करण्यात आले.यामध्ये मनोचिकित्सक डॉक्टरांनी मानसिकरित्या आजारी असणाऱ्या लोकांवर प्रयोग केले. याचा निकाल सकारात्मक आला.
लहान मुलांसाठी घातक
पीडियाट्रिक्स जर्नलमध्ये ऑटिस्टिक मुलांवर संशोधन करण्यात आले. यामध्ये त्यांना निद्रानाशाचा त्रास होत होता. यामध्ये त्यांच्या झोपेत बाधा निर्माण करण्यासाठी एक्टिविटी मॉनिटर लावला होता.याचा निष्कर्ष देखील जवळपास सारखाच होता. त्याचबरोबर ही मुले वजनदार कंबळ हटवू शकत नसल्याने श्वास कोंडण्यासारख्या त्रास होऊ शकतो.
कोणत्या पद्धतीने काम करतात
कंबळमुळे मिळणाऱ्या या आरामाला प्लासिबो इफेक्टला देखील जोडून पहिले जात आहे. यामध्ये वजनदार कंबळ ओढणाऱ्या वाटते वजनामुळे जास्त उब निर्माण होऊन त्याला चांगली झोप लागते. मानसिकदृष्ट्या उपचार सुरु असताना देखील कंबळ यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडते.