मुंबई, 31 डिसेंबर : सध्याचे युग हे टेक्नॉलॉजीचे(Technology) युग आहे. जगभरात दररोज नवनवीन शोध लागत आहेत. मानवाने आपल्या सुविधांसाठी हे शोध लावले असून यामध्ये विविध प्रकारच्या कामांसाठी आणि दैनंदिन आयुष्यातील उपयोगी पडणाऱ्या गोष्टींसाठी विविध शोध लावले जातात. यामध्ये रोबो(Robot) हा खूप महत्त्वाचा शोध मानला जातो.
रोबोच्या मदतीने मानवाने विविध विभागात प्रगती केली असून आजकाल प्रत्येक काम रोबो करू शकतो. वाहन उद्योगांमध्ये रोबो आणि यंत्राच्या साहाय्याने वाहननिर्मिती केली जाते. तर अनेक ठिकाणी रोबोने वृत्तनिवेदक तसंच वेटर म्हणून काम केल्याचे पहिले आहे. अनेक चित्रपटांमध्ये रोबो आपण पाहत असतो. परंतु, आपल्याला ती विज्ञानाची किमया वाटत असून यामध्ये भावना नसल्याचे आपण म्हणतो.
It's pretty awesome how dancing makes robots less intimidating. Looking forward to seeing more nontrivial Machine Learning on these robots. Credit: Boston Dynamics. pic.twitter.com/wnB2i9qhdQ
सध्या मॅट्रॉईडचे सीईओ रझा झादेह (CEO Reza Zadeh) यांनी आपल्या ट्विटरवर (Twitter) तीन रोबो डान्स करत असल्याचा व्हिडीओ अपलोड केला आहे. यामध्ये रोबो डान्स (Dancing Robo) करत असून त्यांनी याला शानदार कॅप्शन देखील दिले आहे. 'डान्सिंग रोबोला कमी त्रास देत असल्याचे आणि तुमच्याबरोबर पार्टीमध्ये, पबमधे किंवा इतर ठिकाणी रोबो डान्स करत असेल तर तुम्हाला कसे वाटेल' असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे.
अनेकदा आपण रोबोमधे भावना नसल्याचे म्हणतो. परंतु, जर तो हसू शकला आणि आपल्याबरोबर डान्स करू शकला तर कसे वाटेल. हा व्हिडीओ पाहून नक्कीच तुम्हाला हा प्रश्न पडला असेल. पण या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने हा रोबो डान्स करत आहे हे पाहून तो जणू मानवाप्रमाणेच डान्स करत असल्याचे अनेकांना भासू शकते. त्यामुळं भविष्यात या गोष्टी नक्कीच शक्य आहेत.
मॅट्रॉईडचे सीईओ रझा झादेह (CEO Reza Zadeh) यांनी हा व्हिडीओ ट्विट केल्यानंतर टेस्लाचे(Tesla) मालक एलन मस्क(Elon Musk) यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. मस्क यांनी यावर ट्विट करत Less? असं म्हटल्याने त्यांच्या ट्विटचा अर्थ कळत नाही. त्यांनी ही प्रगती उत्तम आहे असं म्हटलंय की, ही प्रगती काहीच नाही. असं म्हटलंय? असाही प्रश्न निर्माण होतो.
त्याचबरोबर याला उत्तर देताना झादेह यांनी BD रोबोला जर सर्व भावना समजायला लागल्या तर मानवाच्या वाईट भावना देखील यामध्ये येण्याची भीती व्यक्त केली. तुमच्याशी ऑफलाईन संवाद साधून आनंद झाल्याचं देखील त्यांनी यावेळी मस्क यांना म्हटलं.
दरम्यान, या व्हिडीओमध्ये तीन रोबो डान्स करताना दिसून येत असून त्यांच्या हालचाली या संपूर्णपणे मानवासारख्या दिसून येत आहेत. त्यामुळं आता भविष्यात डान्ससाठी माणसाऐवजी रोबोचा वापर होण्याची देखील शक्यता आहे.