Home /News /viral /

या रेस्टॉरंटमध्ये मिळतो चक्क 'शाकाहारी मासा'; खास डिश खाण्यासाठी गर्दी करतात लोक

या रेस्टॉरंटमध्ये मिळतो चक्क 'शाकाहारी मासा'; खास डिश खाण्यासाठी गर्दी करतात लोक

इथे तुम्हाला अनेक प्रकारचे माशांचे प्रकार पाहायला मिळतील (Special Fish for Vegetarian People). त्यात फिश चिप्सपासून तळलेले फिश, फिश करी इत्यादींचा समावेश आहे. पण तुम्ही शाकाहारी असाल तरीही तुम्ही या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता

    नवी दिल्ली 28 मे : तुम्ही शाकाहारी आहात मात्र एकदा मासे खाऊन पाहायची तुमची इच्छा आहे का? जगात असे बरेच लोक आहेत ज्यांना मांसाहारी पदार्थ खायची इच्छा होते, मात्र सजीवांना खाणं त्यांना पटत नाही, त्यामुळे ते मांसाहार खात नाहीत. जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल तर लंडनमध्ये एक असं रेस्टॉरंट आहे जिथे तुमच्या या समस्येवर उपाय आहे. लंडनमधील एका रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी मासे (Veg Fish) दिले जातात. या रेस्टॉरंटमध्ये पोटभर जेवण करा आणि मिळवा 1 लाख रुपये; फक्त पूर्ण करावी लागेल एक अट लंडनमधील या रेस्टॉरंटचं नाव डॅनियल सटन आहे. इथे तुम्हाला अनेक प्रकारचे माशांचे प्रकार पाहायला मिळतील (Special Fish for Vegetarian People). त्यात फिश चिप्सपासून तळलेले फिश, फिश करी इत्यादींचा समावेश आहे. पण तुम्ही शाकाहारी असाल तरीही तुम्ही या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. हे मासे प्रत्यक्षात शाकाहारी पदार्थांपासून बनवले जातात. अशा परिस्थितीत कोणताही शाकाहारी व्यक्ती ते खाऊ शकतो. यामुळे त्यांचा धर्म भ्रष्ट होणार नाही किंवा त्यांना पापही लागणार नाही. लंडनमधील या रेस्टॉरंटने शाकाहारी लोकांसाठी हा खास मेनू तयार केला आहे. यामध्ये तुम्हाला माशांशी संबंधित अनेक पदार्थ मिळतील. यात करीपासून तळलेल्या फिश चिप्सचाही समावेश आहे. पण हे सर्व पदार्थ शाकाहारी आहेत. त्यांची चव अगदी माशासारखी असल्याचा दावा रेस्टॉरंटच्या मालकाने केला आहे. ते खाल्ल्यानंतर कोणीही म्हणू शकत नाही की हे शाकाहारी आहे आणि खरा मासा नाही. कायच्या काय! कुत्रा बनण्याची हौस पूर्ण करण्यासाठी खर्च केले 11 लाख, फोटो पाहून व्हाल शॉक रेस्टॉरंटच्या मालकाच्या म्हणण्यानुसार, ते त्यांच्या ग्राहकांना व्हेज फिश सर्व्ह करत आहेत. हा मासा एका प्रयोगाद्वारे तयार करण्यात आला आहे. त्यांच्या टीमने हा यशस्वी प्रयोग केला. यामध्ये त्यांनी केळीची फुले आणि सागरी वनस्पती सॅम्फायरचा वापर केला. मसाल्यात मिसळून तळल्यावर त्यांची चव माशासारखी लागते. व्हेज प्रॉन्सही येथे बनवण्यात आले आहेत. हे जपानी बटाट्यापासून तयार केले जातात. व्हेज झिंगाही जपानी बटाट्याच्या स्टार्चपासून बनवला जातो. हा व्हेज मासा खाण्यासाठी दूरवरुन लोक येतात. या पदार्थांची चव सगळ्यांच्याच पसंतीस उतरते.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    पुढील बातम्या