मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Optical Illusion : तुम्हाला या फोटोत आधी काय दिसलं? उत्तरावरून 10 सेकंदात समजेल तुमचं व्यक्तिमत्व

Optical Illusion : तुम्हाला या फोटोत आधी काय दिसलं? उत्तरावरून 10 सेकंदात समजेल तुमचं व्यक्तिमत्व

 फोटो सांगेल व्यक्तिमत्व

फोटो सांगेल व्यक्तिमत्व

बातमीतील ऑप्टिकल इल्युजन असलेल्या चित्रात दोन आकृत्या आहेत, परंतु तुमच्या डोळ्यांनी त्यातली कोणती आकृती पहिल्यांदा पाहिली, ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित रहस्य सांगेल

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 01 ऑक्टोबर : ऑप्टिकल इल्युजन हा ट्रेंड आहे आणि या ट्रेंडमध्ये व्हायरल होणाऱ्या फोटोंमधील कोडी सोडवणं सोपं नाही. हे फोटो आपल्या मेंदुशी खेळत असतात, म्हणजे ऑप्टिकल इल्युजनमध्ये आपण नेमकं काय शोधतोय, हा प्रश्न या फोटोतील कोडी सोडवताना पडेल, इतके ते भ्रमिष्ट करणारे असतात. बऱ्याचदा त्या फोटोतील कोड्याचं उत्तर आपल्या समोर असतं, पण तरीही आपले डोळे मेंदूला गोंधळवतात, म्हणजे अगदी काही सेकंदांत आपलं लक्ष विचलित होतं आणि ते पुन्हा दिसेनासं होतं. दरम्यान, ऑप्टिकल इल्युजनचे हे फोटो आपल्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित रहस्यं उलगडण्याचा दावाही करतात.

बातमीतील ऑप्टिकल इल्युजन असलेल्या चित्रात दोन आकृत्या आहेत, परंतु तुमच्या डोळ्यांनी त्यातली कोणती आकृती पहिल्यांदा पाहिली, ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित रहस्य सांगेल. पहिल्यांदा झाडं पाहणारे लोक अतिशय बोलके आणि लोकांमध्ये लवकर मिसळणारे असतात. तर, दुसरीकडे ज्यांनी ज्यांनी पाठ दाखवणाऱ्या स्त्रीला पहिल्यांदा पाहिलं, ते लोक खूप शांत आणि एकांताचा आनंद घेणारे असतात. आता तुम्ही सांगा, की पहिल्या 10 सेकंदात तुम्ही चित्रात आधी काय पाहिलं?

21 वर्षीय तरुणाने काढला असा Selfie; पाहून पोलीसही हादरले, ताबडतोब केली अटक

चित्रात पहिल्यांदा दोन झाडं पाहणारे लोक कसे असतात?

चित्रात ज्यांना पहिल्यांदा दोन झाडं एकमेकांमध्ये गुंफलेली दिसत आहेत, ते लोक एक्स्ट्रोव्हर्ट असतात. अशा लोकांना खूप बोलायला, नवनवीन लोकांना भेटायला खूप आवडतं. अशा लोकांना एकटं राहणं अजिबात आवडत नाही. त्यांना नेहमी लोकांमध्ये राहायला आणि मजा करायला आवडतं.

पहिल्यांदा महिला पाहणारे लोक कसे असतात?

दुसरीकडे, ज्यांनी पहिल्यांदा चित्रात एक पाठ दाखवत उभी असलेली स्त्री पाहिली ते लोक खूप इंट्रोव्हर्ट असतात. ते लोकांमध्ये लवकर मिसळत नाहीत, त्यांना फार बोलायला आवडत नाही. ते लोकांमध्ये मिळून-मिसळून नाही तर एकटं राहणं पसंत करतात. असे लोक आपल्या एकांताचा प्रचंड आनंद घेतात. शिवाय ते शांत स्वभावाचे असल्याने त्यांना कमी बोलणं आणि कमी गोष्टी करणं आवडतं. खूप बोलणाऱ्या लोकांसोबत राहून त्यांना कंफर्टेबल वाटत नाही. त्यामुळे ते जास्तीतजास्त वेळा एकटेच बसतात आणि स्वतःचीच कंपनी एंजॉय करतात.

5 वर्षापूर्वी हरवलेली व्यक्तीच्या नाकातली रिंग; अखेर शरीराच्या अशा भागात सापडली की डॉक्टरही शॉक

एकाच चित्रात लपलेल्या दोन आकृत्या शोधून आपल्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित रहस्य शोधण्यात लोकांना खूप मजा येते. लोकांना ऑप्टिकल इल्युजनचे भ्रम आणि चॅलेंजेस खूप आवडतात. कारण हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी कोडी सोडवण्याच्या बहाण्याने ते त्यांचा मेंदू कामाला लावतात, ज्यामुळे मेंदू आणखी वेगाने काम करतो. याच कारणामुळे सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचा ट्रेंड जास्त आहे.

First published:

Tags: Photo viral