काश्मीरमधील या PHOTO ने इंटरनेटवर घातला धुमाकूळ; दृश्य पाहून नागरिक भडकले

काश्मीरमधील या PHOTO ने इंटरनेटवर घातला धुमाकूळ; दृश्य पाहून नागरिक भडकले

या फोटो पाहून लोकांनी मनस्ताप व्यक्त केला आहे.

  • Share this:

सोशल मीडिया नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकरणाची चर्चा सुरू असले. एखादा व्हिडिओ वा फोटोवरुन मतमतांतरेही सुरू असतात. अनेक व्हिडिओ पाहूनही लोकांना हसू आवरत नाही. काही गोष्टी तर अत्यंत हैराण करणारी असतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असताना दिसत आहे. जो पाहून लोक हैराण झाले आहे. कारण की हे दृश्य चिंता वाढवणारं आहे. एकत्रितपणे अनेक लोक रस्त्याच्या किनाऱ्यावर लघुशंका करीत असताना दिसत आहे. (This PHOTO of Kashmir has caused a stir on the internet; Citizens were shocked to see the scene)

मिळालेल्या माहितीनुसार हा फोटो जम्मू-काश्मीरचा आहे. सांगितलं जात आहे की, डल लेकच्या किनाऱ्यावर अनेक पर्यटक उभं राहून एकत्रितपणे लघुशंका करीत आहेत. तर शेजारून सतत गाड्या आणि लोक जात आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर हा फोटो ‘Licypriya Kangujam’ नावाच्या युजरने शेअर केला आहे. फोटो शेअर करीत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, सुंदर काश्मीरमधील डल लेकच्या किनाऱ्यावर भारतीय पर्यटक लघुशंका करीत आहेत. शेवटी लोकांची मानसिकता कधी बदलणार? डल लेकचं नाव जगभरात आहे. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाला असून लोकांनी या कृत्यावर संताप व्यक्त केला आहे.

हे ही वाचा-स्टुडिओमध्ये Live शो करत होता पत्रकार, अचानक भलामोठा TV सेट पडला डोक्यावर; VIDEO

फोटो पाहून लोक भडकले

हा फोटो सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लोक सतत शेअर करीत आहेत. 21 शेपेक्षा जास्त लोकांना ही पोस्ट पसंत केली आहे. तर 500 हून अधिक जणांनी रिट्वीट केलं आहे. नेटकरी यावर कमेंट करीत आपला राग व्यक्त करीत आहेत.

 

 

Published by: Meenal Gangurde
First published: March 14, 2021, 5:32 PM IST

ताज्या बातम्या