मुंबई 5 जून: अमेरिकेतील (USA) कॅलिफोर्निया (California) राज्यात विज्ञानाचा एक अद्भूत चमत्कार पहायला मिळतो. इथं एक विद्युत बल्ब (Electric Bulb) आहे जो गेल्या 120 वर्षांपासून सतत पेटता राहिलेला आहे. इतक्या वर्षांत तो फक्त 2 ते 4 वेळा बंद पडला असेल; पण तेदेखील मानवी चुकांमुळे. या शतक पूर्ण करणाऱ्या बल्बबद्दल जगभरात कुतूहल आहे. इतकी वर्षे सलग पेटण्याचा विक्रम नोंदवणाऱ्या या चमत्कारी बल्बची गिनीज बुकसह (Guinness Book) अनेक विश्वविक्रमांमध्ये नोंद झाली आहे.
कॅलिफोर्नियामधील लिव्हरमोर (Livermore) शहरातील फायर ब्रिगेड विभागाच्या गॅरेजमध्ये हा बल्ब लावण्यात आलेला आहे. या बल्बमुळे या शहराला एक विशेष ओळख मिळाली आहे. हा बल्ब 120 वर्षांपासून सतत कसा जळत आहे? याबद्दल लोकांना प्रचंड आश्चर्य वाटतं. त्याचे फिलामेंट (Fillament) आतापर्यंत कसे सुरक्षित आहेत याबद्दल लोकांना कुतूहल वाटते. कारण कोणत्याही बल्बचे फिलामेंट 1-2 वर्षांपेक्षा जास्त काळ टिकू शकत नाहीत, असं तज्ज्ञ सांगतात.
महिला एका वर्षात 20 मुलांची झाली आई; देखभालीसाठी 16 जणांची नेमणूक, आठवड्याला लाखोंचा खर्च
या बल्बला सेंटेनियल (Centennial) म्हणून ओळखले जाते. 1901 मध्ये हा पहिल्यांदा प्रकाशित झाला होता, तेव्हापासून आतापर्यंत तो सतत पेटता राहिला आहे. 1901 मध्ये हा बल्ब 60 वॅटचा होता. मग त्याची शक्ती क्षीण झाली. आता 2021मध्ये या बल्बचा प्रकाश 4 वॅट्स इतकाच राहिला आहे.
हा बल्ब ओहायो (Ohio) इथल्या शेल्बी इलेक्ट्रॉनिक्स (Shelbi Electronics)कंपनीनं 1890च्या उत्तरार्धात बनवला होता. लिव्हरमोर पॉवर अँड वॉटर कंपनीचे मालक डॅनियल बर्नल यांनी तो विकत घेतला होता. होते. हा बल्ब विकत घेतल्यानंतर त्यांनी तो शहरातील अग्निशमन केंद्राला दान केला. तेव्हा पेटलेला हा बल्ब आजतागायत जळत आहे.
17 ऑलिम्पिक स्विमिंग पूल्सचं क्षेत्र व्यापणारा जगातला सर्वांत मोठा 'Swimming pool'
आजतागायत जगात कोणताही बल्ब इतका प्रदीर्घ काळ पेटलेला नाही. असा हा एकमेव बल्ब आहे. 120 वर्षांच्या या प्रवासामध्ये, फक्त दोन वेळा तो बंद करण्यात आला होता. 1937 मध्ये पहिल्यांदा हा बल्ब बंद करण्यात आला कारण तेव्हा या अग्निशमन केंद्रातील इलेक्ट्रिक लाईन्स बदलण्यात येणार होत्या. हे काम झाल्यानंतर पुन्हा हा बल्ब सुरू करण्यात आला. यानंतर 1976 मध्ये अग्निशमन केंद्राची इमारत बदलणार होती. तेव्हा हा बल्ब बंद ठेवण्यात आला होता. एका शानदार संचलनासह हा बल्ब नवीन इमारतीत हलवण्यात आला. तेव्हा 22 मिनिटांसाठी तो बंद होता. नव्या जागेत पोहोचताच पुन्हा तो पेटवण्यात आला आणि तेव्हापासून तो अखंड जळतोच आहे.
त्याच्या अखंड पेटता राहण्याचे रहस्य तरी काय असावे? या प्रश्नाचे उत्तर त्याचं विशेष डिझाइन असं दिलं जातं. हेच यामागचं रहस्य असल्याचा लोकांचा विश्वास आहे. या सेंटिनियल बल्बचा निर्माता एडोल्फ चॉलीएट (Adolf Chollet) होता. इलेक्ट्रिक बल्बचा शोध थॉमस अल्वा एडिसन (Thomas Alva Edison) यांनी लावला असला तरी त्याचे उत्पादन वेगवेगळ्या कंपन्या करत असत. सुरुवातीच्या काळात खूप दिवस चालतील असे बल्ब तयार करण्यात आले होते. 1920 च्या दशकात जगभरात इलेक्ट्रिक बल्ब बनविणार्या कंपन्यांनी 1500 तासांपेक्षा अधिक काळ टिकू नयेत, असे बल्ब बनवण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून बल्ब खराब झाल्यावर ग्राहक नवीन बल्ब खरेदी करतील. बल्बचा शोध लागल्यानंतरच्या काळात हा बल्ब निर्माण करण्यात आला होता. त्यामुळं त्याची रचनाच प्रदीर्घ काळ टिकण्याच्या दृष्टीनं करण्यात आली होती. 2013 मध्ये हा बल्ब फ्युज झाल्याचं दिसून आलं, परंतु वायर तपासल्यानंतर लक्षात आलं की बल्ब नव्हे तर 76 वर्षे जुनी वायर खराब झाली आहे. वायर बदलताच बल्ब पुन्हा पेटू लागला.
अशा या चमत्कारी सेंटिनियल बल्बचे जगभरात असंख्य चाहते आहेत. हे लक्षात घेऊन एक विशेष वेबसाइट तयार करण्यात आली असून ती कॅमेर्याशी जोडण्यात आली आहे. हा कॅमेरा दर 30 सेकंदाने या बल्बचा नवीन फोटो टिपतो आणि तो वेबसाइटवर प्रसारित केला जातो. या वेबसाइटवर या बल्बबाबतची सर्व माहिती, फोटो तसंच ऐतिहासिक घटनांची माहिती देण्यात आली आहे. तुम्हीही या वेबसाइटला भेट देऊन हा आश्चर्यकारी बल्ब पाहू शकता. त्यासाठी http://www.centennialbulb.org/cam.htm या वेबसाइटला भेट द्या.
Published by:Mandar Gurav
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.