प्राणीसंग्रहालयात सुरक्ष रक्षकांनी चक्क चिंपांझीकडून धुवून घेतले कपडे, VIDEO VIRAL

प्राणीसंग्रहालयात सुरक्ष रक्षकांनी चक्क चिंपांझीकडून धुवून घेतले कपडे, VIDEO VIRAL

कधी चिंपांझीला कपडे धुताना पाहिले आहे? अजिबात मिस करू नका हा व्हिडीओ.

  • Share this:

बीजिंग, 11 डिसेंबर : जंगली चिंपांझी माणसाच्या खूप जवळचा मानला जातो. मानवाप्रमाणेच त्यांना भावना असतात. त्यांच्या कृतींमध्येही एका मनुष्याची छबी दिसते. अनेक अभ्यासानुसार चिंपांझी आणि मानवांमध्ये बरीच समानता आढळली आहे. अशातच सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिंपांझी चक्क कपडे धुताना दिसत आहे.

चीनमधील प्राणीसंग्रहालयातील हा व्हिडीओ असून, या व्हिडीओमध्ये एक चिंपांझी कपडे धुताना दिसला, लोक हा व्हिडिओ पाहून आश्चर्यचकित झाले. दक्षिण-पश्चिम चीनच्या चोंगकिंगमधील लेहे लेडू थीम पार्कमध्ये राहणाऱ्या 18 वर्षीय यूहुई नावाच्या चिंपांझीचा हा व्हिडीओ आहे. यात यूहुई नावाचा चिंपांझी आपल्या किपरटा टी-शर्ट साबण आणि ब्रशने धुताना दिसत आहे. 30 मिनिटांच्या व्हिडीओमध्ये अगदी एखाद्या मनुष्याप्रमाणे चिंपांझी कपडे धुत आहे. हा व्हिडिओ चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे.

वाचा-हत्तीचा अजब जुगाड! चलाखीनं ओलांडला रेल्वे ट्रॅक, VIDEO VIRAL

स्थानिक मिडीयानं दिलेल्या माहितीनुसार, यूहुईने त्याच्या किपरचे कपडे धुताना दिसत आहे. जेव्हा त्याच्या किपरला कळले की चिंपांझी कपडे धुत आहे तेव्हा त्यानं हळुच टी-शर्ट, साबण आणि ब्रश ठेवला. एक प्रयोग म्हणून हे करण्यात आले होते. मात्र चिंपांझीनं अगदी योग्य प्रकारे हे कपडे धुतले. स्थानिक वृत्तसंस्थांना दिलेल्या माहितीत किपरनं , "कधीही चिंपांझीला कपडे धुवायला द्यायचा हेतू नव्हता, परंतु त्याने मला न थांबता पाहिले, म्हणून मी विचार केला की हे काम तो एकटा करू शकतो", असे सांगितले.

वाचा-कर्तव्य माऊलीचे! सामना सुरू असतानाच स्तनपानासाठी थांबली खेळाडू अन्...

वाचा-नवी मुंबई: गाडीची टेस्ट घेताना दिला एक्सलेटरवर पाय, पहिल्या मजल्यावरून उडाली कार

मुख्य म्हणजे कपडे धुण्याव्यतिरिक्त, युहूई मनुष्य करत असलेल्या बर्‍याच गोष्टी देखील करतात. जेव्हा तो बोटांनी हृदयाचा आकार बनवितो आणि एका पायावर उभाही राहू शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2019 08:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading