मराठी बातम्या /बातम्या /Viral /या 106 वर्षांच्या आजींची बोटं अजूनही खेळतात पियानोवर, दीर्घायुष्याचं हे आहे गुपित

या 106 वर्षांच्या आजींची बोटं अजूनही खेळतात पियानोवर, दीर्घायुष्याचं हे आहे गुपित

वय हा केवळ एक आकडा असतो हे अनेक माणसं जगताना सिद्ध करतात. या आजींचं आयुष्य तसंच आहे.

वय हा केवळ एक आकडा असतो हे अनेक माणसं जगताना सिद्ध करतात. या आजींचं आयुष्य तसंच आहे.

वय हा केवळ एक आकडा असतो हे अनेक माणसं जगताना सिद्ध करतात. या आजींचं आयुष्य तसंच आहे.

पॅरिस, 08 फेब्रुवारी : जगात सामान्य माणसं वयाच्या कुठल्या टप्प्यावर काय करायचं हे ठरवून त्यानुसारच जगतात. मात्र अनेकजण याला अपवाद असतात. त्यामुळंच ती असामान्य ठरतात. असंच एक उदाहरण म्हणजे कोलेट मेज या आजी (granny).

कोलेट मेज यांचं आपल्या कामाबाबत वेड पराकोटीचं आहे. ते पाहता त्यांच्या वयाचा (age) अंदाज लावणं अवघड आहे. कोलेट राहतात फ्रान्समध्ये. कोलेट आपली सगळी ऊर्जा आणि उत्साह एकवटून पियानो वाजवतात. अगदी चार वर्षांच्या असल्यापासून त्यांची बोटं (fingers) पियानोवर लीलया फिरतात. आजही वयाची 106 वर्षे त्यांनी पूर्ण केलेली असताना हे अविरत सुरू आहे.

त्या सांगतात, 'पियानो वाजवल्यानं माझं मन आनंदी राहतं. मी केवळ स्वतःच्या आनंदासाठी पियानो वाजवते. 1914 साली एका मध्यमवर्गीय कुटुंबात (family) कोलेटचा जन्म झाला. आईनं त्यांचं होम स्कूलिंग केलं. वडील खतांच्या प्रकल्पावर व्यवस्थापक होते. कोलेट यांनी पॅरिसच्या (Paris) नॉर्मेल डी म्युझिक या संस्थेतून संगीताचं शिक्षण घेतलं. कोलेट या वयातही आपला छंद (hobby) जोपासू शकण्याचं श्रेय नियमितपणे योगा (yoga) आणि जिम्नॅशियम (gymnasium) करण्याला देतात.

त्या मानतात, की लोकांना जिवंत राहायला जशी जेवणाची गरज असते तशी मला पियानो वाजवण्याची आहे. त्या सांगतात, माझी बोटं पियानोला स्पर्श केल्यावाचून राहूच शकत नाहीत. कोलेट यांचे आजवर सहा म्युझिक अल्बम (music album) रिलीज झाले आहेत. त्यांचा एक मुलगा आहे ज्याचं नाव आहे फॅब्रिक मेज. फॅब्रिकच्या मते या कोरोनाच्या काळात त्याची आई (mother) म्हणजे आत्मविश्वास आणि आशेचं एक जितंजागतं उदाहरण आहे.

First published:

Tags: France