मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पोलिसांसमोर पार्किंगमधील स्कूटीवर चोरांनी मारला डल्ला; हातचलाखी पाहून व्हाल थक्क, VIDEO

पोलिसांसमोर पार्किंगमधील स्कूटीवर चोरांनी मारला डल्ला; हातचलाखी पाहून व्हाल थक्क, VIDEO

या व्हिडिओमध्ये सर्वाधिक हैराण करणारी बाब म्हणजे त्याने स्कूटीला कसलंही नुकसान पोहोचवलं नाही. कुलूप न उघडताच अवघ्या काही सेकंदात त्याने किमती सामान बाहेर काढलं.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 27 नोव्हेंबर : सोशल मीडियाचं (Social Media) जग अतिशय विचित्र आहे. इथे कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. पाहायला गेलं तर जगभरात हजारो चोरीच्या घटना घडत राहतात. मात्र आता चोरीचा असा व्हिडिओ (Theft Video) सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral Video) होत आहे, जो पाहून काही वेळासाठी तुम्हीही हैराण व्हाल.

आपल्या सर्वांना माहिती आहे की चोर केवळ संधीची वाट पाहत असतात. संधी मिळताच ते हात साफ करून घेतात. अनेकदा तर चोर दिवसाढवळ्या आणि गर्दीच्या ठिकाणीदेखील चोरी करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यात दिसतं की चोराने डिक्कीचं कुलूप न उघडताच लोकांना चोरी करून दाखवलं. या व्हिडिओमध्ये सर्वाधिक हैराण करणारी बाब म्हणजे त्याने स्कूटीला कसलंही नुकसान पोहोचवलं नाही. कुलूप न उघडताच अवघ्या काही सेकंदात त्याने किमती सामान बाहेर काढलं.

View this post on Instagram

A post shared by MEMES.BKS (@memes.bks)

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की चोरीचा लाईव्ह डेमो पाहण्यासाठी पोलीस बाईक पार्किंगमध्ये पोहोचले आणि पकडलेल्या चोराला पार्किंगमध्ये उभा असलेल्या स्कूटीमधील सामान चोरण्यास सांगितलं. यानंतर दोघांच्यातील एका चोराने स्कूटीची गादी वरच्या बाजूला ओढली आणि दुसऱ्या चोराने मध्येच जागा बनवत त्यात हात घातला. यानंतर आतमध्ये ठेवलेली पर्स बाहेर काढली. चोरीची ही स्टाईल पाहून पोलिसही थक्क झाले.

हा व्हिडिओ पाहून अनेकांनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, हा चोर तर खरंच अतिशय स्मार्ट आहे. याची हातचलाखी पाहून पोलिसही हादरले असतील. तर आणखी एका यूजरने कमेंट करत लिहिलं, बापरे, अशी हातचलाखी तर मी आजपर्यंत पाहिली नाही. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ memes.bks नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 35 हजारहून अधिकांनी पाहिला आहे.

First published:

Tags: Shocking video viral, Theft