इक्वेडोर, 11 सप्टेंबर : कोरोनामुळे सध्या जगभरातील सर्व शाळा-महाविद्यालये बंद झाली आहेत. त्यामुळे ऑनलाइन लेक्चर झूम अॅपवर घेतली जातात. मात्र झूमवर लेक्चर सुरू असतानाच भयंकर प्रकार घडताना दिसत आहेत. अमेरिकेतील इक्वेडोरमध्ये एक असाच धक्कादायक प्रकार घडला. ऑनलाइन क्लास सुरू असतानाच एका विद्यार्थिनीच्या घरात चोर घुसले. ही घटना 4 सप्टेंबर रोजी घडली असल्याची माहिती सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये शिक्षक मुलांना इंग्रजी शिकवत असल्याचे दिसत आहे. यावेळी अचानक एका तरुणीच्या घरात चोरटे घुसतात, तिला धमकावून घरातील सामान चोरी करतानाही दिसत आहेत. याच वेळी चोरानी तिचा लॅपटॉप बंद केला. तरुणीच्या काही मित्रांनी झालेला प्रकार पाहिला आणि शिक्षकांना सतर्क केले. त्यानंतर तिच्या घराचा पत्ता आणि फोन नंबर घेऊन शिक्षकांनी पोलिसांना फोन केला.
वाचा-VIDEO: पाण्यात पाय टाकताच समोर होता 14 फूटी लांब शार्क आणि...वाचा-VIDEO: रस्त्याच्या कडेला पांढरी चादर ओढून झोपला तरुण; मृतदेह समजून जमा झाले लोक
पोलिसांना अलर्ट केल्यानंतर ताबडतोब इक्वाडोर पोलिसांनी चोरट्यांना कारमधून पळ काढत असताना धरले. त्यांच्याकडून 4000 डॉलर्स (2.9 लाख रुपये) रोख रक्कम, दोन बंदूका, शस्त्रे, दोन मोबाइल फोन, एक लॅपटॉप आणि एक व्हिडिओ गेम्स कन्सोल जप्त केले.हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सर्तक विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच ऑनलाइन क्सासमुळे या चोरांना पकडण्यात यश आले असे पोलिसांनी सांगितले.
वाचा-लॉकडाऊनमध्ये कबाब खाण्याची आली हुक्की! महिलेला द्यावे लागले सव्वा लाख
दरम्यान, याआधी झूम कॉलवर मीटिंग सुरू असताना एक कपल अश्लील चाळे करताना दिसले होते. हा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. तर, किंडर गार्डनमधील मुलं वर्ग सुरू असतानाच झोपतानाचा एका व्हिडीओही व्हायरल झाला होता.
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.