• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • फेसबुक पोस्ट पडली चांगलीच महागात; अचानक गायब झालं महिलेच्या कारमधील पेट्रोल, काय आहे प्रकरण?

फेसबुक पोस्ट पडली चांगलीच महागात; अचानक गायब झालं महिलेच्या कारमधील पेट्रोल, काय आहे प्रकरण?

सध्या लंडनमध्ये इंधनाच्या कमीमुळे अनेक अडचणी येत आहेत. यादरम्यान जेन्नीनं आपल्या कारमध्ये 4 हजार तीनशे रुपयांचं पेट्रोल भरलं.

 • Share this:
  नवी दिल्ली 02 ऑक्टोबर : आजच्या काळात पेट्रोल किंवा डिझेल (Petrol and Diesel) हा लोकांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भागच बनलं आहे. डिझेल आणि पेट्रोल एका काळानंतर संपूही शकतं आणि याची निर्मिती पुन्हा होण्यात बराच वेळही जाऊ शकतो. यामुळे लोक पर्यायी गोष्टींचा वापर अधिक करत आहेत. यात सोलर आणि थर्मल एनर्जीचा (Solar And Thermal Energy) समावेश आहे. यादरम्यानच आता यूकेमध्ये इंधनाची कमी (Lack of Fuel) असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. लंडनमध्ये (London) राहणाऱ्या एका महिलेसोबत याच कारणामुळे जे घडलं ते सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. लंडनमध्ये राहणारी 34 वर्षीय महिला जेन्नी टर्नर (Jenni Turner) हिनं सोशल मीडियावर (Social Media) आपल्या गाडीची टाकी फूल केल्याची बातमी शेअर केली होती. पेट्रोलची कमी असतानाही महाग पेट्रोल भरल्याचं तिला लोकांना दाखवायचं होतं. मात्र, याचा परिणाम काय होईल, याचा विचार तिनं केला नाही. लग्नात जास्त केक खाणाऱ्यांना जोडप्यानं पाठवले विचित्र मेसेज, पाहून पाहुणे हादरले सध्या लंडनमध्ये इंधनाच्या कमीमुळे अनेक अडचणी येत आहेत. यादरम्यान जेन्नीनं आपल्या कारमध्ये 4 हजार तीनशे रुपयांचं पेट्रोल भरलं. शो ऑफ करण्यासाठी तिने हे फेसबुक पोस्ट (Facebook Post) करून सांगितलं. पुढे जे घडलं त्याची कल्पनाही तिनं केली नव्हती. चोरांनी जेन्नीच्या कारच्या फ्यूल बॉक्समध्ये दोन छेद करून पेट्रोल चोरी केलं. जेन्नीनं आपल्या कारमध्ये 50 युरो म्हणजेच तब्बल 4 हजार 300 रुपयांचं पेट्रोल भरून घेतलं. यानंतर तिनं याची माहिती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली. तिनं म्हटलं की तुटवडा आणि महागाई असतानाही तिनं आपल्या गाडीची टाकी फूल करून घेतली. मात्र, तिनं याचा विचारच केला नाही की असं करणं म्हणजे चोरांना आमंत्रण देणं आहे. चक्क जेसीबीवरुन निघाली लग्नाची वरात; नवरी-नवरदेवाचा हा Video ठरतोय चर्चेचा विषय संध्याकाळी सुमारे साडेसहा वाजताच चोरांनी ही टाकी रिकामी केली. जेन्नीनं सांगितलं, की आधी कारकडे लक्ष देत नसे. मात्र, ही घटना घडली त्यादिवशी पार्किंगमधील कार चेक करण्याचा विचार तिच्या डोक्यात आला. गाडीखाली पसरलेलं इंधन पाहून ती हैराण झाली. जेन्नीनं आपल्यासोबत घडलेली ही घटना सोशल मीडियावर शेअर केली आहे. लोकांनी तिला या घटनेतून शिकण्याचा सल्ला दिला आहे. तर, कारमधून पेट्रोल चोरी होण्याच्या घटना वाढल्यानं पोलिसांचं काम मात्र वाढलं आहे. आता टीम अशा लोकांवर लक्ष ठेवत आहे, जे पार्किंगमधील कारच्या आसपास फिरताना दिसत आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: