मराठी बातम्या /बातम्या /Viral /सायकल चोरून पळाला चोर; मालकाने अशी घडवली अद्दल, CCTV मध्ये कैद झाली घटना, VIDEO

सायकल चोरून पळाला चोर; मालकाने अशी घडवली अद्दल, CCTV मध्ये कैद झाली घटना, VIDEO

दररोज तुम्ही कित्येक चोरीच्या आणि दरोड्याच्या घटना ऐकत असाल. मात्र, काही चोर असं काहीतरी करून जातात जे पाहूनच आपल्याचा हसू आवरत नाही.

दररोज तुम्ही कित्येक चोरीच्या आणि दरोड्याच्या घटना ऐकत असाल. मात्र, काही चोर असं काहीतरी करून जातात जे पाहूनच आपल्याचा हसू आवरत नाही.

दररोज तुम्ही कित्येक चोरीच्या आणि दरोड्याच्या घटना ऐकत असाल. मात्र, काही चोर असं काहीतरी करून जातात जे पाहूनच आपल्याचा हसू आवरत नाही.

नवी दिल्ली 22 नोव्हेंबर : सोशल मीडियावर (Social Media) जर तुम्ही सक्रीय असाल तर अनेकदा तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळत असतील. यातील काही व्हिडिओ (Viral Videos) अतिशय मजेशीर असतात. तर काही व्हिडिओ हैराण करणारे असतात. काही व्हिडिओ तर असेही असतात जे पाहून आपल्याला डोळ्यांवर विश्वास बसत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे (Funny Video of Thief) जो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. दररोज तुम्ही कित्येक चोरीच्या आणि दरोड्याच्या घटना ऐकत असाल. मात्र, काही चोर असं काहीतरी करून जातात जे पाहूनच आपल्याचा हसू आवरत नाही.

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका घराच्या मालकाने आपल्या घराचं गेट बंद केलेलं आहे. यादरम्यान संधीचा फायदा घेत चोर तिथे येतो. यानंतर तो घरात डोकावून बघतो की आतमध्ये कोणी आहे का किंवा कोणी त्याला बघतंय का. जवळ कोणीच नसल्याची खात्री होताच त्याची नजर समोर उभा असलेल्या स्कूटी आणि सायकलवर जाते. यानंतर चोर सायकल घेऊन वेगात दरवाजाच्या बाहेर जातो.

मालकाने मात्र चोराला चोरी करताना पाहिलेलं असतं. मालक आपली सायकल परत मिळवण्यासाठी चोराच्या मागे धावतो. यानंतर काही वेळात मालक आपली सायकल पुन्हा घरी आणताना दिसतो. चोर आणि मालकाची ही पळापळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ हैराण करणारा असला तरीही मजेशीरही आहे. चोर आणि मालकाचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. लोकांना हा व्हिडिओ इतका आवडला आहे की ते वारंवर क्लिप पाहात आहेत. हा व्हिडिओ memes.bks नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत 38 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हा आकडा सातत्याने वाढत आहे.

First published:
top videos

    Tags: Shocking video viral, Theft