मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIRAL VIDEO: छोट्या खिडकीतून एन्ट्री, चोराची ट्रिक पाहून पोलिसही चक्रावले

VIRAL VIDEO: छोट्या खिडकीतून एन्ट्री, चोराची ट्रिक पाहून पोलिसही चक्रावले

छोट्या खिडकीतून चोराची एन्ट्री; ट्रिक पाहून पोलिसही चक्रावले, तुम्ही पाहिला का VIDEO

छोट्या खिडकीतून चोराची एन्ट्री; ट्रिक पाहून पोलिसही चक्रावले, तुम्ही पाहिला का VIDEO

चोरी करण्यासाठी चोर अनेक आयडीया लढवत असतात. पण खिडकीच्या दोन गजांच्यामध्ये असणाऱ्या छोट्याशा जागेचा फायदा घेत अशा पद्धतीने चोराने घरामध्ये घुसणे सहसा कधी पाहण्यात काय ऐकण्यास सुद्धा येत नाही.

    मुंबई, 10 डिसेंबर : चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी पकडल्यानंतर पोलीस (Police) अनेकदा त्याला घटनास्थळी घेऊन जातात. घरामध्ये कसा प्रवेश केला, कोणत्या खोलीमध्ये उचकापाचक केली, पैसे-दागिने (money and jewelry) कुठे सापडले, याची चौकशी करताना एकप्रकारे चोरी कशी केली, याबाबतचे प्रात्यक्षिक चोराला दाखवण्यास सांगतात. मात्र, एका चोराने घरामध्ये चोरी करण्यासाठी खिडकीतून (window) कशा पद्धतीने आलो, याचे प्रात्यक्षिक दाखवले आणि ते पाहून पोलीस देखील चकीत झाले.

    पोलिस आणि चोर यांचे नाते (relationship) तसं वेगळचं. या दोघांना एकमेकांची बलस्थाने आणि उणिवा (strengths and weaknesses) चांगल्याच ठाऊक आहेत. एकीकडे चोर कुठल्या थराला जाऊ शकतात, हे पोलिसांना चांगलंच माहीत असते. तर पोलीस काय करू शकतात, हे चोरांनाही चांगलंच माहीत आहे. पण चोरांची एक गोष्ट अशी आहे की, ते दिवसाढवळ्या कोणाच्याही डोळ्यात धूळफेक करून चोरी करून निघून जातात. त्यामुळे चोरटे कोणतेही अशक्य काम शक्य करून दाखवू शकतात, हे पोलिसांनाही माहीत आहे.

    सध्या अशाच एका चोराचा व्हिडीओ व्हायरल (viral video) होत आहे. त्यामध्ये तो अरुंद खिडकीतून घरामध्ये प्रवेश करतो. एका चोराला पोलिसांनी पकडून घरासमोर नेले असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्या घराची खिडकी अगदी लहान आहे. या खिडकीतून कोणीही घरात प्रवेश करू शकणार नाही, असे वाटेल. परंतु जेव्हा पोलिसांनी त्या चोराला या खिडकीतून जाण्यास सांगितले, तेव्हा तो ज्या सहजतेने खिडकीतून घरात गेला, ते पाहून पोलिसही चकीत झाले.

    वाचा : हृदयाचा थरकाप उडवणारं वेडिंग फोटोशूट तुम्ही पाहिलं का? डोक्याच्या अगदी वरून धूर सोडत गेलं विमान

    ट्विटरवर @DRGulati80 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 'पोलिसांना खात्री नव्हती की हा चोर या खिडकीतून कसा बाहेर पडेल. मग चोराने डेमो दाखवला, असे कॅप्शन देखील या व्हिडीओसोबत आहे. या व्हिडीओला हजारो व्ह्यूज आणि शेकडो लाइक्स मिळाले आहेत.

    हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया युजर्सने वेगवेगळ्या कमेंट दिल्या आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले, 'भाऊ, चोरांकडे सर्व काही करण्याचे अप्रतिम तंत्र असते.' व्हिडीओवर कमेंट करताना दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'केवळ एक एक्सपर्ट या पद्धतीने चोरू करू शकतो.' याशिवाय आणखी बऱ्याच युजर्सने या व्हिडीओवर कमेंट्स दिल्या आहेत.

    वाचा : एका मित्राचा सूट, दुसऱ्याचा लॅपटॉप घेऊन दिला नोकरीसाठी Interview; पुढे जे झालं ते पाहून तुम्हाला वाटेल कौतुक

    असा आला खिडकीतून चोर

    खिडकीतून आत जाण्यासाठी चोराने प्रथम त्याचे दोन्ही पाय खिडकीला असणाऱ्या दोन लोखंडी गजांच्यामध्ये असणाऱ्या जागेतून आत घातले. मग हळू हळू तो त्याचे शरीर खिडकीतून आतमध्ये घालण्याचा प्रयत्न करतो, त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये तो खिडकीतून आत जातो.

    चोरी करण्यासाठी चोर अनेक आयडीया लढवत असतात. पण खिडकीच्या दोन गजांच्यामध्ये असणाऱ्या छोट्याशा जागेचा फायदा घेत अशा पद्धतीने चोराने घरामध्ये घुसणे सहसा कधी पाहण्यात काय ऐकण्यास सुद्धा येत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर चोराचा हा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे.

    First published:

    Tags: Video viral, Viral