• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • अरे आवरा यांना! Splendor वर इतके लोक बसले की मोजणंही झालंय अवघड; पाहा Shocking Video

अरे आवरा यांना! Splendor वर इतके लोक बसले की मोजणंही झालंय अवघड; पाहा Shocking Video

अनेकदा तुम्ही बाईकवर अनेक लोक बसलेले पाहिले असतील, मात्र हा व्हिडिओ अत्यंत धक्कादायक आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 13 मे : बऱ्याचदा बेकायदेशीर असतानाही दुचाकीवरुन तीन तर कधी कधी चार जणं प्रवास करताना आपण पाहिलं असेल. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्या दोन तीन किंवा चार नाही तर बाईकवर बसलेले लोक मोजणंही अवघड झालं आहे. वाहतुकीच्या नियमांनुसार एका बाईकवर एक किंवा दोन पेक्षा अधिक लोक प्रवास करू शकत नाही आणि अनेक ठिकाणी तर दोघांनाही हेल्मेट घालणे अनिवार्य आहे. येथे मात्र नियमांची पायमल्ली करीत बाईकवर 6 पेक्षा अधिक प्रवासी बसलेले दिसत आहे. एका बाईकवर सहापेक्षा जास्त लोक या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, एका बाइकवर इतके लोक बसले आहेत. त्यांना मोजणंही अवघड झालं आहे. इतकच नाही तर दुचाकी स्वार जलद गतीने गाडी चालवत आहे. या मुलांना हा धोकादायक स्टंट मजा वाटत असली तरी हा प्रकार गंभीर आहे. अशा परिस्थितीत अपघात झाला तर जबरदस्त फटका बसू शकतो.
  हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, परंतु असं करणं चुकीचं आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ तब्बल साडे पाच लाख वेळा पाहण्यात आला आहे. पवन दीप नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या पोस्टवर अनेकांनी सूचनाही दिल्या आहेत. कुठे पडू नका, सांभाळून गाडी चालवा असा सल्ला दिला जात आहे.

  Published by:Meenal Gangurde
  First published: