मराठी बातम्या /बातम्या /Viral /शिकार खुद शिकार हो गया! सोन्याची चेन चोरुन पळाला आणि...पाहा चोरीच्या घटनेचा अजब VIDEO

शिकार खुद शिकार हो गया! सोन्याची चेन चोरुन पळाला आणि...पाहा चोरीच्या घटनेचा अजब VIDEO

एक व्यक्ती सोन्याची चेन चोरी करण्याच्या बहाण्याने दुकानात येतो. चेन चोरी करुन पळण्याच्या प्रयत्नांत तो असतो. पण त्याला स्वत:च ती चेन दुकानदाराला परत करावी लागते.

एक व्यक्ती सोन्याची चेन चोरी करण्याच्या बहाण्याने दुकानात येतो. चेन चोरी करुन पळण्याच्या प्रयत्नांत तो असतो. पण त्याला स्वत:च ती चेन दुकानदाराला परत करावी लागते.

एक व्यक्ती सोन्याची चेन चोरी करण्याच्या बहाण्याने दुकानात येतो. चेन चोरी करुन पळण्याच्या प्रयत्नांत तो असतो. पण त्याला स्वत:च ती चेन दुकानदाराला परत करावी लागते.

नवी दिल्ली, 7 जुलै: रस्त्यावरुन चालताना अचानक चेन, मंगळसुत्र चोरट्यांनी (Theft) ओढल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. चोर कितीही शातिर, हुशार असला तरी तो कधीतरी कुठेतरी अडकतोच. चोरीच्या अनेक घटनांचे असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. पण एका प्रकरणात मात्र चोरी करण्यासाठी आलेला चोर स्वत: चांगलाच अडकला आहे. त्याच्या चोरीचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये (Viral Video) कैद झाला असून त्याला चोरी करायला जाणं चांगलंच महागात पडलं आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती ज्वेलरी शॉपमध्ये (Jewellery Shop) जातो. वस्तू चोरी करुन तो पळण्याच्या प्रयत्नांत होता, पण पुढे असं काही होतं की चोरी तर नाहीच, पण त्याला चांगलीच अद्दल घडते.

सोशल मीडिया साईट ट्विटरवर चोरीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एका ज्वेलरी शॉपमधील आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय, की एक व्यक्ती सोन्याची चेन चोरी करण्याच्या बहाण्याने दुकानात येतो. चेन चोरी करुन पळण्याच्या प्रयत्नांत तो असतो. पण त्याला स्वत:च ती चेन दुकानदाराला परत करावी लागते.

ज्वेलरी शॉपमध्ये सर्वसाधारणपणे मोठी सुरक्षा असते. या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या ज्वेलरी शॉपमध्ये देखील अशीच सुरक्षा असल्याचं दिसतंय. यात ग्राहक दुकानांत आल्यानंतर दरवाजा आपोआप बंद होतो. त्यानंतर ग्राहक स्वत: बाहेर पडू शकत नाही. हा चोर चेन घेऊन पळतो खरा पण दरवाजा आपोआप बंद झाला असल्याने, त्याला तो ओपन करता येत नाही. आपण अडकल्याचं त्याला लक्षात येतं आणि तो स्वत:हून चेन दुकानदाराला परत करतो.

(वाचा - नवरदेवाला पाहताच उडाला नवरीच्या चेहऱ्याचा रंग; ढसाढसा रडली आणि...; पाहा VIDEO)

हा व्हिडीओ आतापर्यंत 6 लाखांहून अधिक वेळा पाहण्यात आला आहे. ज्यावेळी त्या चोराला आपण फसलो असल्याचं समजलं, त्यावेळी त्याने चेन तर परत केली. परंतु त्याला पोलिसांच्या हवाले करण्यात आलं.

First published:
top videos

    Tags: Social media viral, Video viral