मुंबई, 02 मे : सोशल मीडियावर चोरीचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यात काही चोरांची चोरी करण्याची पद्धत पाहूनच चक्रावायला होतं. काही दिवसांपूर्वी बुलडोजरने एटीएम मशीन फोडल्याचा व्हिडीओ समोर आला होता आणि आता तर बाईक चोरीचा असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून सर्वजण हैराण झाले आहेत
(Bike chori video).
बाईक चोरी म्हटली की एखादी पार्किंगमधील बाईक पळवणं किंवा रस्त्यात चालकाला धमावून त्याच्याकडून बाईक नेणं असे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण बाईक चोरीचा हा व्हिडीओ खूप वेगळा आहेत. यात चोरट्यांनी दिवसाढवळ्या बाईकवर अशा पद्धतीने डल्ला मारला की तुम्ही विचारही केला नसेल.
हे वाचा - Yummy! 3 वर्षांच्या चिमुकल्याने इवल्याशा हातांनी बनवली इतकी भारी Dish; Recipe Video पाहूनच तोंडाला सुटेल पाणी
व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती बाईकवरून येतो. एका ठिकाणी त्याने बाईक पार्क केली आणि एका दुकानात तो गेला. काही सामान खरेदी करण्यासाठी तो दुकानात घुसला. तितक्या त्याच्यामागे असलेल्या दोन चोरांनी संधी साधली. दिवसाढवळ्या या चोरट्यांनी बाईकवर डल्ला मारला. पण त्यांची चोरी करण्याची स्टाईल पाहिली तर तुम्ही हैराण व्हाल.
चोरट्यांनी पूर्ण बाईक चोरली नाही तर त्यांनी बाईकचा एकेएक पार्ट काढला. जेव्हा बाईकचा मालक तिथं आला तेव्हा त्याला शॉक बसला. कारण जिथं त्याने बाईक पार्क केली होती तिथं फक्त बाईकचं हँडल राहिलं होतं. बाकी बाईक गायब झाली होती.
हे वाचा - पाण्यातून दुचाकी चालवण्याच्या प्रयत्नात होता व्यक्ती; घडली भयंकर दुर्घटना, अपघाताचा LIVE VIDEO
brown_monda34 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.