या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या अंध मित्राला घेऊन फुटबॉल मॅच (Football Match) पाहण्यासाठी स्टेडिअमवर आल्याचं दिसत आहे. अंध मित्र सामना पाहू शकत नसल्याने ती व्यक्ती आपल्या मित्राला सामन्याच्या प्रत्येक घडामोडीचे अपडेट्स (Update) देत होती. डोळे नसले तरी ही अंध व्यक्ती आपल्या मित्रामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांप्रमाणे सामन्याचा आनंद घेत असल्याचं दिसत आहे. त्याचदरम्यान स्टेडिअमवरच्या एका कॅमेरामनने (Cameraman) हा प्रसंग कॅमेरात चित्रित केला आणि या मित्रांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हे ही वाचा-VIDEO: हे काय भलतंच!गर्लफ्रेंडला कारवर बांधून शहरभर फिरवलं,कारण ऐकून व्हाल हैराण व्हिडिओत होणारं या दोघांच्या मैत्रीचं दर्शन पाहून नेटिझन्स भावूक झाल्याचं दिसून आलं. आपला मित्र अंध असला तरी सामना पाहताना आपल्याला जितका आनंद मिळतो, तितकाच आनंद आपल्या मित्रालाही मिळावा यासाठी ही व्यक्ती जीवापाड प्रयत्न करताना पाहून अनेक नेटिझन्सचे डोळे पाणावले असतील. प्रसंग कोणताही असो आपला मित्र आपल्यासोबत असतो. त्यामुळे मैत्रीचं हे उदाहरण प्रत्येकासाठी प्रेरक असल्याच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया नेटिझन्सनी नोंदवल्या. इन्स्टाग्रामवर (Instagram) हा व्हिडिओ आतापर्यंत 4 कोटी लोकांनी पाहिला असून, 37 लाख लोकांनी लाइक केला आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Football, Friendship, Social media