मुंबई, 1 फेब्रुवारी : मनात आलेला विचार प्रयत्नपूर्वक प्रत्यक्षात उतरवण्याचा आनंद काही वेगळाच असतो. असं यश नक्कीच प्रेरणा देणारं असतं. इस्रायलमधल्या एका पायलटला स्वमालकीचं विमान असावं असं वाटत होतं. त्यानं मनातला हा विचार प्रत्यक्षात उतरवला. या पायलटने तीन वर्षांत स्वतः विमान तयार केलं. या विमानातून त्याने वीस वेळा प्रवासदेखील केला आहे. हे विमान बनवण्यासाठी या पायलटला 90 लाख रुपये खर्च आला. पायलटने विमान तयार करण्याची प्रक्रिया आणि त्याचा संपूर्ण प्रवास सोशल मीडियावरून शेअर केला आहे. `
एका पायलटने अवघ्या तीन वर्षांत स्वतःसाठी विमान तयार केलं आहे. त्याने हे विमान कसं तयार केलं याची क्रमवार प्रक्रिया सोशल मीडियावरून शेअर केली आहे. या सेल्फमेड विमानाने 11 ऑगस्ट 2022 रोजी पहिलं उड्डाण केलं. आतापर्यंत या विमानाने 20 वेळा उड्डाण केलं आहे. इस्रायल मधले 34 वर्षांचे पायलट रॉय बेन अनत यांना स्वतःचं एअरक्राफ्ट असावं असं वाटत होतं. ते म्हणाले, `हे विमान तयार करण्यासाठी मला सुमारे 90 लाख रुपये खर्च आला. या विमानाने मी आतापर्यंत 20 वेळा प्रवास केला आहे. या विमानाचा कमाल वेग ताशी 360 किलोमीटर आहे. विमानात एका वेळी 80 लिटर इंधन भरता येतं. हे विमान अडीच तासांत 670 किलोमीटर अंतर कापते. या विमानाचा वापर फक्त इस्रायलमध्येच केला जाऊ शकतो. इतर देशांमध्ये हे विमान नेण्याची परवानगी नाही.`
हेही वाचा: Viral Video : वरात यायला उशीर झाला, म्हणून गच्चीवर गेली नवरी आणि...
रॉय बेन अनत यांनी या सेल्फमेड विमानाच्या निर्मितीची सर्व प्रक्रिया यू-ट्यूब चॅनेल आणि इन्स्टाग्रामवरून शेअर केली आहे. याशिवाय त्यांचा एरियल फोटोग्राफी आणि ड्रोनचा व्यवसाय आहे. इन्स्टाग्रामवर त्यांना 12 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
View this post on Instagram
तुम्ही हे विमान का तयार केलं, या प्रश्नावर बोलताना रॉय म्हणाले, `मला नेहमीच स्वतःचं विमान असावं असं वाटत होतं. माझं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी विमान तयार केलं. विमान बनवण्यासाठी चार कोटी रुपये खर्च येतो, असं मला सुरुवातीला समजलं. त्यानंतर मी स्वतः वर्कशॉपमध्ये काम सुरू केलं. तीन वर्षांच्या अथक परिश्रमातून मी स्वतःचं विमान तयार केलं. या विमानाने 11 ऑगस्ट 2022 रोजी पहिलं उड्डाण केलं. हे विमान तयार करण्यासाठी मला माझ्या वडिलांचा पूर्ण पाठिंबा होता.` रॉय यांचं हे सेल्फमेड विमान इस्रायलमध्ये चर्चेचा विषय ठरलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Travel by flight