मराठी बातम्या /बातम्या /Viral /तरुणाने 'या' गोष्टीच्या मदतीने कमी केलं 21 किलो वजन, फिटनेस मंत्रा ऐकून तुम्हीही व्हाल Shock

तरुणाने 'या' गोष्टीच्या मदतीने कमी केलं 21 किलो वजन, फिटनेस मंत्रा ऐकून तुम्हीही व्हाल Shock

फिटनेस

फिटनेस

वाढतं वजन ही आजकाल अनेकांना भेडसावणारी समस्या आहे. पण, कॅनडामधील डेंटिस्ट अवजितसिंगची कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    नवी दिल्ली, 18 मार्च : वाढतं वजन ही आजकाल अनेकांना भेडसावणारी समस्या आहे. पण, कॅनडामधील डेंटिस्ट अवजितसिंगची कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी आहे. तो सध्या यूकेमध्ये मास्टर्स प्रोग्रॅम करत आहे. अवजित निरोगी व फिट होता, पण कॅनडाला गेल्यावर लाइफस्टाइल बदलल्यामुळे त्याचे वजन खूप वाढले. पण नंतर एकवेळ अशी आली की या 26 वर्षीय तरुणाने फक्त तीन महिन्यांत 21 किलो वजन कमी केलं. त्याने कोणत्या टिप्स फॉलो करून 106 किलो वजन 85 किलोपर्यंत कमी केलं, ते जाणून घेऊयात. यासंदर्भात 'टाइम्स ऑफ इंडिया'ने वृत्त दिलंय.

    टर्निंग पॉइंट

    अवजित हा टिपिकल पंजाबी मुलगा आहे, त्याला खायला खूप आवडतं. कॅनडामध्ये शिकताना त्याचं वजन खूप वाढलं. सुरुवातीला त्याने ऑनलाइन रिसर्च करून स्वतःच वजन कमी करण्याचा प्रयत्न केला, पण एकटा राहत असल्याने शिक्षण, पार्ट टाइम जॉबमुळे डाएटकडे त्याचं दुर्लक्ष होऊ लागलं. शिवाय तो फास्ट फूड आणि पॅकेज्ड फूड खायचा.

    हेही वाचा -  आनंदाच्या भरात नवरदेवाने केलं असं काही...स्वतःच्याच लग्नाला जाऊ शकला नाही

    "वजन कमी करणं आपल्याला कंटाळवाणं वाटतं, त्यामागचं एक कारण म्हणजे आपण काम आणि हेल्दी लाइफस्टाइल नीट मॅनेज करू शकत नाही. वाढत्या वजनामुळे अवजितला अनेक समस्या उद्भवू लागल्या आणि त्याचं वजन दैनंदिन कामात अडथळा ठरू लागलं आणि त्याला चिंता वाटू लागली,” असं अविजितच्या फिटनेस कोच रिहाना कुरेशी म्हणाल्या. त्या न्युट्रिशनिस्ट व स्ट्रेंथ ट्रेनिंग कोचही आहेत.

    डाएट

    अवजितची लाइफस्टाइल खूप हेक्टिक होती. तो दिवसा कॉलेजला जायचा आणि नंतर पार्ट टाइम नोकरी करायचा. त्याला स्वयंपाक करण्यासाठी किंवा आहाराची काळजी घेण्यासाठी फारच कमी वेळ मिळायचा. त्यामुळे सर्वात आधी त्याची लाइफस्टाइल लक्षात घेऊन न्यूट्रिशन प्लॅन तयार करण्यात आला. त्याला वारंवार भूक लागणार नाही, अशा आहाराचा यात समावेश करण्यात आला.

    ब्रेकफास्टमध्ये ऑलिव्ह ऑइलमध्ये शिजवलेली अंडी, दुपारचं जेवण तो घरीच तयार करायचा. सर्वात आधी तर जेवण बनवणं सोपं आहे, हे कोचनी त्याला सांगितलं. त्यासाठी त्याला काही सोप्या व लवकर बनणाऱ्या रेसिपी सांगितल्या. रात्रीच्या जेवणात चिकन किंवा मांसाहारी पदार्थ आणि त्याच्या आवडत्या भाज्या असायच्या.

    फीटनेस

    फीटनेस

    व्यायाम

    अवजितच्या धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे त्याच्याकडे व्यायामासाठी वेळ नसायचा. पण तो संगीतप्रेमी असल्याने त्याला आवडती गाणी ऐकत फिरायला जाण्यास कोचने मोटिव्हेट केलं आणि त्याचा परिणाम दिसून आला. अवजितलाही ‘म्युझिक वॉक’ आवडू लागला. त्याचा रिझल्ट पाहून तो इतका प्रेरित झाला की त्याने वर्कआउटही सुरू केले.

    फिटनेस सिक्रेट

    ‘या बदलाचं सिक्रेट साधेपणा आहे. आम्ही इथं अतिशय मूलभूत गोष्टींवर काम केलंय. तुम्ही क्लायंटसाठी गोष्टी जितक्या सोप्या कराल तितके ते कन्सिस्टंट असतील आणि रिझल्टही तितकाच चांगला मिळेल. याशिवाय दररोज त्यांचा प्रोग्रेस ट्रॅक केल्याने कोणीतरी त्यांच्यावर लक्ष ठेवतंय ही जाणीव निर्माण होते, हेच अवजितबरोबर झालं आणि त्याला हार न मानण्याची प्रेरणा मिळाली,’ असंही कुरेशी यांनी सांगितलं.

    जास्त वजनाचा होणारा परिणाम

    जास्त वजन असण्यामुळे पचनासंबंधी अडचमी वाढतात, त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर जास्त होतो. यामुळे आत्मविश्वास कमी होऊन मानसिक समस्या उद्भवतात.

    लाइफस्टाइलमध्ये कोणते बदल करण्यात आले

    फास्ट फूडचं सेवन कमी करून स्वतःसाठी जेवण बनवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. हे काही सोप्या रेसिपी शेअर करून अवजितला सांगण्यात आलं. तसेच संध्याकाळी त्याच्याकडे वेळ असायचा, तर आम्ही त्याला डिनरनंतर आवडती गाणी ऐकतऐकत वॉक करायला सांगितलं. यामुळे त्याचं डिनर पचायला मदत झाली आणि त्याच्या झोपेच्या रुटीनमध्येही सुधारणा झाली.

    First published:

    Tags: Fitness, Health, Viral