हे '2' शब्द ऐकताच 62 दिवसानंतर कोमातून बाहेर आला तरुण; डॉक्टरही झाले हैराण

हे '2' शब्द ऐकताच 62 दिवसानंतर कोमातून बाहेर आला तरुण; डॉक्टरही झाले हैराण

डॉक्टरांनी तरुण कोमातून पुन्हा बाहेर येऊ शकेल याची आशा सोडली होती, मात्र...

  • Share this:

नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर : ऐसेअसे अनेक लोक असतात की जे आपल्या आवडीचे पदार्थ केव्हाही खाऊ शकतात. अगदी भूक नसली तरीही आपला आवडता पदार्थ पाहताच त्यांची खाण्याची इच्छा जागी होते. असे तर अनेक लोक तुम्ही पाहिले असतील. मात्र तुम्ही कधी अशा व्यक्तीबद्दल ऐकलं का जो आपल्या आवडीच्या पदार्थाचं नाव ऐकून कोमातून बाहेर आला? नक्कीच अशी घटना चमत्कारापेक्षा कमी नाही. आज असाच एक किस्सा ऐकवणार आहोत. ताइवानमध्ये 18 वर्षांचा किशोरवयीने मुलगा गेल्या अनेक दिवसांपासून कोमामध्ये होता. मात्र जेव्हा अचानक त्याच्या आवडत्या खाद्यपदार्थाचं नाव ऐकलं तो शुद्धीत आला.

कुटुंबाना आशा सोडली होती

या तरुणाला डॉक्टर आणि कुटुंबाच्या प्रयत्नांनंतरही कोमोतून बाहेर आणता आलं नाही. याचं नाव चीयू आहे. त्याच्या संपूर्ण कुटुंबाने आशा सोडली होती. तेव्हा हा चमत्कार झाला आणि तो कामातून बाहेर आला.

स्कूटरवरील अपघातामुळे झाला होता जखमी

ताइवानच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार उत्तरी-पश्चिमी ताइवानमधील हा तरुण जुलै महिन्यात स्कूटरवर झालेल्या अपघातामुळे गंभीर जखमी झाला होता. या अपघातामुळे चीयू मरता मरता वाचला. त्याच्या शरीरात अनेक ठिकाणी अंतर्गत जखमा झाल्या होत्या, त्यामुळे तो स्मरणशक्तीही गमावून बसला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे त्याच्यावर उपचार सुरू होते. तो जिवंत होता मात्र तो कोमामध्ये गेला होता. 2 महिने कोमांमध्ये राहिल्यानंतर जेव्हा 62 व्या दिवशी चीयूचा मोठा भाऊ त्याची थट्टा करीत होता. तेव्हा तो कोमातून बाहेर आला.

मोठ्या भावाच्या थट्टेमुळे चीयू परतला

रुग्णालयात चीयूला भेटायला आलेला त्याचा मोठा भाऊ त्याची थट्टा करीत होता..तो म्हणाला...भाऊ मी तुझं आवडतं चिकन फिलेट खाणार आहे. आपल्या आवडत्या पदार्थाचं नाव ऐकताच तो बेशुद्धीच्या अवस्थेतून बाहेर येऊ लागला. ही जादू केवळ चीयूच्या आवडत्या चिकन फिलेटमुळे झाली आहे. शुद्धीवर आल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी चीयूला केकसह अलविदा केलं.

Published by: Meenal Gangurde
First published: November 9, 2020, 7:01 PM IST
Tags:

ताज्या बातम्या