• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • VIDEO : हा खरा महिला दिन! छेडछाड करणाऱ्या रोमियोंना भररस्त्यात विद्यार्थिनीने चोप चोप चोपलं!

VIDEO : हा खरा महिला दिन! छेडछाड करणाऱ्या रोमियोंना भररस्त्यात विद्यार्थिनीने चोप चोप चोपलं!

चार दिवसांपूर्वीच आपण महिला दिन साजरा केला. त्यानंतर पुन्हा छेडछाडीच्या घटना समोर येत आहेत. मात्र या विद्यार्थिनीने त्याला चांगलीच अद्दल घडवली

 • Share this:

  लखनऊ, 12 मार्च : उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात पोलीस हद्दीतील बाजार परिसरात काही रोमियोंना विद्यार्थिनीने चांगली अद्दल घडवली. या रोड रोमियोंनी विद्यार्थिनीसोबत छेडछाड केल्याची घटना समोर आली होती. मात्र विद्यार्थिनी थांबली नाही तर तिने त्या रोमियोंना चांगलंच प्रत्युत्तर दिलं. महिलांनी आपल्या स्वसंरक्षणासाठी उभं राहणं गरजेचं आहे, असं म्हणताना या बातमीतून अनेक तरुणींना प्रेरणा मिळेल. हे रोड रोमियो विद्यार्थिनीकडून तिचा मोबाइल क्रमांक मागत होते. यानंतर विद्यार्थिनीने भररस्त्यात रोमियोंना चांगलीच अद्दल घडवली. विद्यार्थिनीने या तरुणांची धुलाई केली. चांगला चोप दिल्यानंतर पोलिसांकडे त्यांना सुपूर्द केलं. (The young boy was teasing a girl student on road, she hit him with a stick)

   मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी बाजार भागातील रजबन परिसरात राहते. शुक्रवारी ती कॉलेजला जात होती. दरम्यान काही रोड रोमियोंनी तिच्यासोबत छेडछाड केली. पहिल्यांदा तर विद्यार्थिनीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र त्यानंतर ते तिच्याकडून मोबाइल नंबर मागू लागले. हे तरुण ऐकत मागे जात नसल्याचं लक्षात आल्यानंतर तिचा पारा चढला. विद्यार्थिनीने भररस्त्यात दोघांची कॉलर पकडून त्यांना चांगलाच चोप दिला. हे ही वाचा-ऑर्डर कॅन्सल केली म्हणून आला राग; डिलिव्हरी बॉयने महिलेसोबत काय केलं पाहा VIDEO विद्यार्थिनीवर करत होते अश्लील कमेंट रोड रोमियोंवर आरोप आहे की, ते विद्यार्थिनीवर अश्लील कमेंट करीत होते. यावेळी पोलीसही घटनास्थळी हजर झाली. तेव्हा तर विद्यार्थिनीने पोलिसांची काठी घेऊन तरुणाना मारू लागली. बाजारातील लोकांनी या प्रकाराचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. यानंतर पोलीस दोन्ही तरुणांना ठाण्यात घेऊन गेली. विद्यार्थिनीने रोमियोंविरोधात तक्रार करीत कारवाईची मागणी केली. ठाण्याचे प्रभारी विजेंद्र राणा यांनी सांगितलं की, दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून पोलीस पुढील कारवाई करीत आहे.

   

  Published by:Meenal Gangurde
  First published: