मराठी बातम्या /बातम्या /Viral /

भयंकर! डिलिव्हरीच्या वेळी वेदना होतील या विचाराने महिलेचं धक्कादायक पाऊल, काही तासात मृत्यू

भयंकर! डिलिव्हरीच्या वेळी वेदना होतील या विचाराने महिलेचं धक्कादायक पाऊल, काही तासात मृत्यू

महिला 8 महिन्यांची गर्भवती होती. बाळाच्या बातमीमुळे घरात आनंद होता. मात्र...

महिला 8 महिन्यांची गर्भवती होती. बाळाच्या बातमीमुळे घरात आनंद होता. मात्र...

महिला 8 महिन्यांची गर्भवती होती. बाळाच्या बातमीमुळे घरात आनंद होता. मात्र...

  • Published by:  Meenal Gangurde

चेन्नई, 1 ऑक्टोबर : तमिळनाडूमधील (Tamilnadu Shocking News) चेन्नईतील एका सरकारी रुग्णालयात 8 महिन्यांची गर्भवती महिलेला गर्भपात (Abortion) करण्यासाठी गोळ्या घेतल्यानंतर मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. मूळची ओडिसामध्ये राहणारी कुनारी कंजाका आपले पती प्रताप उलाका आणि पुतणी गीता कंजाकासोबत चेन्नईमध्ये राहत होती.

डिलिव्हरीमध्ये होणाऱ्या वेदनेमुळे होती त्रस्त..

पोलिसांनी सांगितलं की, महिला काही दिवसांपूर्वी आपल्या पुतणीसह एका नातेवाईकासह कोणा नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारात सामील होण्यासाठी ओडिसा गेली होती. येथे एका महिलेचा प्रसुतीदरम्यानच्या गुंतागुतीमुळे (Complications during Pregnancy) मृत्यू झाला होता. तेथून परतल्यानंतर महिला तणावात राहू लागली होती. ती सतत डिलिव्हरीदरम्यान होणाऱ्या वेदनेचा विचार करीत असे.

औषधांमुळे गर्भात झालं होता संसर्ग...

टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, 20 सप्टेंबर चेन्नईला गेल्यानंतर ती बाथरूममध्ये पाय घसरून पडली होती. त्यानंतर मात्र तिचं वारंवार पोट दुखत होतं. यानंतर कुटुंबीयांनी महिलेला किलपोक मेडिकल कॉलेज येथील रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी तपासानंतर सांगितलं की, तिच्या गर्भात संसर्ग झाला आहे आणि गर्भाशय काढण्यास सांगितलं. यानंतर सर्जरी करण्यात आली, मात्र तरीही ती बरी झाली नाही आणि यातच महिलेचा मृत्यू झाला. (The womans shocking step thinking that there would be pain at the time of delivery death in a few hours)

हे ही वाचा-जिवंत राहण्यापेक्षा तू मेलेला परवडशील! पित्यानेच पोटच्या लेकराला नदीत फेकलं

पोस्टमार्टममध्ये झाला खुलासा..

महिलेच्या मृत्यूनंतर पोस्टमार्टम रिपोर्ट आणि कुटुंबीयांनी चौकशी केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली. महिलेने गर्भपातासाठी औषधं घेतली होती. डॉक्टरांनी सांगितलं की, कुमारी कंजाकाने गर्भपातासाठी गोळ्या घेतल्या होत्या. गर्भपाताच्या गोळ्या घेणं आणि ते देखील आठव्या महिन्यात हे अत्यंत धोकादायक असतं. गर्भापातानंतर गर्भाशय नाजूक होतं आणि गोळ्यांमुळे रुग्णाच्या जीवावर बेतू शकतं.

First published:

Tags: Death, Pregnancy, Shocking news, Women