• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • सतत कान खाजवायची महिला, मायक्रोस्कोपमधून पाहिलं तर डॉक्टरही झाले हैराण; पाहा VIDEO

सतत कान खाजवायची महिला, मायक्रोस्कोपमधून पाहिलं तर डॉक्टरही झाले हैराण; पाहा VIDEO

अनेकदा लोक रिकाम्या वेळात कान खाजवताना दिसतात. हा स्वयं-स्वच्छतेचा भागही मानला जातो. मात्र...

 • Share this:
  अनेकदा लोक रिकाम्या वेळात कान खाजवताना दिसतात. हा स्वयं-स्वच्छतेचा भागही मानला जातो. अनेकांना आंघोळ केल्यानंतर कान स्वच्छ करण्याची सवय असते. मात्र जर तुमच्या कानात वळवळ होत असल्याचं जाणवल्यास मोठी अडचण निर्माण होऊ शकते. धमतरी जिल्हा रुग्णालयात आलेल्या महिलेने डॉक्टरांना अशीच अडचण सांगितली होती. जेव्हा डॉक्टरांनी मायक्रोस्कोपमधून कानाच्या आत पाहिलं तेव्हा तेदेखील हैराण झाले. डॉक्टरांनी महिलेच्या कानातून एक वळवळणारा किडा बाहेर काढण्याचा हा व्हिडीओ आहे. जो ऑपरेट करून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर महिलेच्या जीवात जीव आला. महिला धमतरी जोधा पूर येथील आहे. कधी किडा कानात शिरला हे महिलेच्याही लक्षात आलं नाही. हे ही वाचा-मटण नाही तर लग्नही नाही; भडकलेल्या नवरदेवाचा भरमंडपात सप्तपदींसाठी नकार मात्र कानात वळवळ होत असल्याचं तिला जाणवत होतं. शेवटी न राहवून महिला डॉक्टरांकडे आली आणि हा धक्कादायक खुलासा झाला. पावसाळ्यात किड्यांचं प्रमाण वाढलं. त्यात जर जमिनीवर झोपायची सवय असेल तर अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: